कामगार चळवळीपुढील
समस्या history
Answers
Answer:
व्यक्ती एकत्र येऊन हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. सामाजिक चळवळी समाजव्यवस्थेत अनुकूल स्वरूपातून सामाजिक बदल घडवून आणतात. समाजातील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांना समोर ठेवून चळवळी आकारास येतात. त्यामध्ये मिरवणूका, मोर्चे, घोषणा, आंदोलने इत्यादी कृतींचा उपयोग केला जातो. ते दृष्य स्वरूपात असतात.
सामाजीक चळवळी हे समाजशास्त्रातील महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र मानले गेले असून त्याचा अभ्यास करत असतांना अनेक अभ्यासकांनी विविध संकल्पनात्मक चौकटी विकसित केल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करत असतांना फुक्स आणि लिन्केन बाख यांनी असे प्रतिपादन केले की, सामाजिक चळवळींच्या अध्यापनाचे अभ्यासक्षेत्र प्रामुख्याने दोन घटकात विभागले आहे. एकीकडे सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासाने चळवळीत सहभाग घेतलेल्या सामाजिक कर्त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर भर दिला; तर दुसरीकडे व्यापक सामाजिक–राजकीय व्यवस्था, संघर्ष यांवर भर देत सामाजिक चळवळींकडे ‘राजकीय प्रकल्पाचे वाहक’ म्हणून बघितले आहे. या संदर्भात रुडाल्फ हेर्बेल, नील स्मेल्सर, जॉन विल्सन, ड्रेसलर व विलिस, हर्बर्ट ब्लूमर, टर्नर व किलियन, लुंडबर्ग, जे. आर. गसफील्ड इत्यादी समाजशास्त्रज्ञ-विचारवंतांनी ‘सामाजिक चळवळ’ या शब्दाची व्याख्या केली आहे.
Answer:
भारतातील कामगार चळवळ ही वेतन, महागाई भत्ता, बोनस इ. कारणांमुळे झाली. ह्या चळवळीचा एक विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील कापडगिरण्यांतील कामगारांनी संप केला असता, कामगार व कारखानदार ह्यांतील मतभेद सामोपचाराच्या मार्गांनी कसे सोडविता येतील, याबद्दल गांधीजींनी घालून दिलेला आदर्श.
Explanation:
please make me as brilliant.