Political Science, asked by abhishekbhure143, 13 hours ago

कोण सकारात्मक स्वातंत्र्याचे
समर्थक होते?​

Answers

Answered by rajeshbhure495
0

Answer:

सकारात्मक स्वातंत्र्यनुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीनेेे व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे.कारण त्यांच्या मते,नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामुहिक इच्छांचा ही स्वीकार केला. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जीचे प्रतिनिधीत्व शासनसंस्था करते, म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचारांचे रुसो समर्थन करतात. सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयाला आली आहे.नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुभाव,आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला.स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो

Similar questions