कोणकोणत्या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे
Answers
Explanation:
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार
भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. आता पर्यत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. परंतु, पाच वेळा हा पुरस्कार दुभागून दिला गेल्यामुळे आतापर्यंत ५८ साहित्यिकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील एकून २२ शासकीय राज भाषांपैकी चार वेळा मराठी भाषेचा गौरव करण्यात आला आहे.
१. वि.स. खांडेकर
१९७४ मध्ये पहिल्यांदाच मराठी कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. वि. स.खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. वि.स. खांडेकर यांचे ललित्यपुर्ण आणि भावार्थ अशी ययाती कादंबरी ही मराठी साहित्य क्षेत्रासाठी एक वरदान ठरली. त्यांना ‘ययाती’ या कादंबरीसाठी १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. खांडेकर यांनी ‘ययाती’ कादंबरीतून जीवन जगण्याचे अंतिम तथ्य काय आणि शेवटी असणारे अंतिम सत्य याचे फार सुंदर आणि मार्मिक अर्थ विषद केले आहेत.
२. वि. वा. शिरवाडकर
१९८७ मध्ये वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या नटसम्राट नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असेही म्हणतात. कुसुमाग्रजांच्या कविता या मराठी भाषेचा दागिना आहेत. त्यामुळेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले नटसम्राट हे नाटक अजरामर नाटक ठरले आहे. या नाटकावर चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे.
३. विंदा करंदीकर
विंदा करंदीकर यांच्या ‘अष्टदर्शने’ या काव्य संग्रहाला २००३ साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या काव्य संग्रहात करंदीकरांनी सात युरोपीय आणि एक भारतीय तत्त्वज्ञ यांच्या लेखनावर आधारीत ओव्या रुपात पुस्तक लिहिले आहे. विशेष म्हणजे विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराची मिळालेली रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. विंदाच्या रंजक आणि वैचारिक काव्यांवर लोकांनी फार प्रेम केले आहे. त्यांच्या काव्यांमध्ये वास्तवाची तितकीच जाणीव आहे.
४. भालचंद्र नेमाडे
२०१४ मध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांनी हि कादंबरी लिहिण्यापूर्वी तब्बल तीस वर्षे लेखन विश्रांती घेतली होती. त्यांच्या कोसला कादंबरीलाही वाचकांनी भरभरुन पसंती दिली होती. ‘देखणी’ आणि मेलडी या प्रचलित कविता संग्रह आहेत. बिढार, जरिला, झूल या त्यांच्या काल्पनिक कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर समीक्षक म्हणूनही त्यांची एक वेगळी ख्याती