Geography, asked by ravindralaxmanchavan, 3 months ago

कोणल्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती​

Answers

Answered by arpitakatrad41
0

Answer:

लोकसंख्येचा विस्फोट म्हणजेच जागतिक लोकसंख्येची वाढ : ही विशेषेकरून गेल्या तीनशे वर्षांमध्ये फारच झपाट्याने झाली. जागतिक लोकसंख्या सुरुवातीपासून १८३० अखेर १०० कोटींपर्यंतच वाढली. पुढील केवळ शंभर वर्षांत म्हणजे १९३० च्या सुमारास ती २०० कोटी झाली व त्यापुढील तीस वर्षांत म्हणजे १९६० मध्ये ती ३०० कोटींपर्यंत वाढली. पुढील तीस वर्षांत तिच्यामध्ये आणखी ४०० कोटींची भर पडेल, असा अंदाज आहे. (२) लोकसंख्येचे संकेंद्रीकरण : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही भागांतच सापेक्षतेने संकेंद्रित होऊन राहण्याची लोकांची प्रवृत्ती हीसुद्धा अलीकडेच विशेषतः दिसून येते कारण एकोणिसाव्या शतकाच्या अगोदर १० लक्ष किंवा अधिक वस्तीची शहरे आढळत नसत.

Explanation:

. (३) लोकवस्ती बहुविधता : संस्कृती, भाषा, धर्म, मूल्ये व वेश भिन्नभिन्न असतानासुद्धा लोकांची एकाच स्थळी समान आर्थिक व राजकीय व्यवस्थेखाली राहण्याची प्रवृत्ती. ही प्रवृत्तीदेखील अलीकडेच घडून आलेल्या वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील क्रांतीमुळे जगाचे जे संकोचन झाले आहे, त्यांमुळे उद्‌भवली आहे.

नागरीकरणाची प्रक्रिया घडून येण्यास सुरुवातीस काही गरजा पुऱ्या व्हाव्या लागतात : हवा व जमीन, वनस्पती आणि प्राणिमात्र यांना अनुकूल असावी लागते, पाणीपुरवठा पुरेसा उपलब्ध व्हावा लागतो, निवाऱ्याचे साहित्य मुबलक मिळावे लागते. शिवाय समूहजीवनासाठी आवश्यक त्या आर्थिक व सामाजिक संस्था (उदा., मालमत्ता, श्रम, कुटुंब, सेवा व वस्तूंच्या देवघेवींची व्यवस्था, संरक्षणसेवा इ.) नागरीकरणापूर्वींच अस्तित्वात याव्या लागतात. काहींच्या मते नागरीकरणासाठी नव्या दृष्टिकोनाचीही गरज असते.

जगाच्या इतिहासात नागरीकरणाचे निरनिराळे आकृतिबंध दिसून येतात. ख्रिस्ताब्दपूर्व ५००० वर्षांअगोदर लोकवस्ती खेड्यांतच आढळत असे. ख्रिस्ताब्दपूर्व ३५०० वर्षांपासून काही शहरेपण अस्तित्वात आली. याचे कारण जलसिंचन व कृषिपद्धतींमध्ये सुधारणा झाल्यामुळे व नवीन हस्तव्यवसाय उदयास आल्याने लोकवस्त्यांमध्ये स्थैर्य येऊन त्यांचा विस्तारही शक्य झाला. टायग्रिस–युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांत चाकांचा शोध लागून वाहने वापरली जाऊ लागली. त्यामुळे रस्तेबांधणी सुरू झाली आणि रस्तेवाहतुकीच्या व जलवाहतुकीत्या सोयी वाढल्या. अशा पुरातन शहरांमधील लोकसंख्याघनता ख्रिस्ताब्दपूर्व २०० च्या सुमारास दर चौ. मैलास ७६,००० ते १,२८,००० पर्यंत असावी, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. (सध्याच्या काही शहरांतील लोकसंख्याघनता प्रत्येक चौ. मैलास अशी आहे : न्यूयॉर्क २६,३०० सॅनफ्रान्सिस्को १०,९०० टोकिओ ३९,७०० पॅरिस ६३,६५०). पुरातन काळी शहरांच्या संरक्षणासाठी सभोवती भिंतींचे तटही उभारावे लागत. तंत्रशास्त्र व समाजसंघटना अप्रगत असल्यामुळे ग्रीक-रोमन काळापर्यंत एक लक्ष किंवा अधिक वस्तीची शहरे अस्तित्वात नव्हती. सेनादलसामर्थ्यावर ग्रीक संस्कृतीमध्ये विस्तृत पृष्ठप्रदेशावर ताबा गाजवून मोठ-मोठी शहरे बांधून त्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवणे शक्य झाले. रोमन साम्राज्यातही अशीच परिस्थिती चालू राहिली, किंबहुना शहरांचा आणखी विकास झाला. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमची लोकसंख्या जास्तीत जास्त आठ लाखांपर्यंत गेली असावी, असा अंदाज आहे. याचे कारण कालवे बांधून व नळ टाकून मोठ्या वस्तीला पाणीपुरवठा करण्याची सोय रोमनांनी केली. शहरांमध्ये अनेक व्यवसाय चालत. मोठमोठ्या इमारतीही शहरात असत. उदा., देवळे व पार्थनाद्वारे, धान्याची गुदामे, शस्त्रास्त्रांची कोठारे व यंत्रशाळा, प्रशासन, संरक्षण, धर्मपालन व अर्थकारण यांची जबाबदारी घेणारे तसेच अंतर्गत व परदेशीय व्यापार करणारे यांचे वास्तव्य शहरातच असे.

रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला, तरी रोमन तंत्रविद्या पुढील काळात टिकून राहिली आणि वाढत्या व्यापारामुळे हिंदुस्थान व चीन यांची प्रगत तंत्रविद्याही पाश्चिमात्य देशांना उपलब्ध झाली. त्यामुळे बंदुकीची दारू, कागद व छपाई यांसारख्या वस्तू पाश्चिमात्यांना मिळू लागल्या व नागरीकरणाचा वेग वाढण्यास मदत झाली.

Similar questions