India Languages, asked by rameshrajput16h, 17 days ago

कोणत्याही २ मराठी कविता लिहा ( अभ्यासक्रमात नसलेल्या​

Answers

Answered by vidhyadhumal217
2

Answer:

एकदा बालपण दिले तर

मी माझ्या शाळेत जाईन

पावसाळ्यात एकाच छत्रीत दोघे मित्र

खांदे भिजवत शाळेत येऊ

पुन्हा एकदा बालपण दिले तर

खापराचा पाटीवर पेन्सिलने गीरावीन

मित्रांशी गट्टी कधी कट्टी

बाई वर्गात येईपर्यंत धिंगाणा घालीन

पिटीचा तासाला मन भरून खेळेल

पुन्हा एकदा बालपण दिले तर

पोटात दुखतंय म्हणून दांडी मारील

शाळा भरायचा एक तास आगोदर गृहपाठ करील

शेवटच्या तासाला घंटा कधी वाजतेय याची वाट बघेन

शाळा सुटल्यावर शाळा सुटली पाटी फुटली

असं म्हणत घराकडे पळत जाईन

पुन्हा एकदा बालपण दिले तर…

Explanation:

 सैनिक बोलतो

रणांगणावर लढले शत्रूशी,

कणखर मी उभा राहतो.

भारत मातेच्या रक्षणार्थ सज्ज मी

या भूमीवर रक्त सांडतो.

रत्नगर्भा मज भासे दैवत,

कधीच मागे सोडले घर दौलत.

धरित्री हीच माझी प्रेयसी,

हितगुज जणू करते मजसी.

शत्रु संग लढताना देहभान मी विसरतो,

रक्ताच्या थारोळ्यात असतानादेखील,

निधराने सीमेवर उभा राहतो.

ना खंत ना कसली ना मोह कशाचा,

मनीषा ही उरी झेंडा असेल गगनी माझ्या राष्ट्राचा.

मी सैनिक निधड्या छातीचा,

देश रक्षणासाठी जन्म आमचा.

राखेतून झेपावून शत्रूला नेस्तनाबूत

करण्याचा ध्यास,

परत जन्म घेऊन सैनिक होण्याची आस.

मनी एकच कामना दैवी एकच प्रार्थना,

योद्धा म्हणून जगण्याची आणि मरण्याची धारणा.

Similar questions