Art, asked by ItzMissPayal, 3 days ago

कोणत्याही ऑलिंपिक खेळाची माहिती लिहा .
एक विषय निवडून

answer me fast​

Answers

Answered by shindesarthak796
2

Badminton Information in Marathi बॅडमिंटन खेळ आजच्या काळातील जगातील लोकप्रिय खेळ म्हणजे बॅडमिंटन होय आणि हा खेळ १८ व्या शतकापासून खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लागतात आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष दोघेही खेळू शकतात आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील समाविष्ठ आहे. बॅडमिंटन या खेळामध्ये जर हा खेळ एकेरी खेळ असेल तर या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि जर हा खेळ दुहेरी खेळ असेल तर या खेळामध्ये ४ खेळाडू असतात. हा खेळ तीन भागामध्ये विभागलेले असतो आणि यामधील प्रत्येक २१ अंकांचा असतो.

बॅडमिंटन खेळाचा इतिहास badminton history of

बॅडमिंटन खेळाचा पूर्वीचा इतिहास नक्की काय होता है उलघडू शकले नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते हा खेळ १५०० बीसी च्या काळात भारतामध्ये खेळला जायचा असे म्हंटले जाते. बॅडमिंटन या खेळाला पूर्वीच्या काळी पुना या नावाने ओळखले जायचे कारण या खेळाचा उगम हा पुणे शहरातुन झाला होता त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी १८७० मध्ये हा खेळ भारताबाहेर नेला. असे म्हणतात कि बॅडमिंटन हा खेळ ड्यूक ऑफ ब्युफर्टने हा खेळ पहिल्यांदा आपल्या मित्रासोबत खेळला होता म्हणून ड्यूक ऑफ ब्युफर्टला बॅडमिंटन या खेळाचा जनक मानले जाते.

बॅडमिंटन खेळाचे मैदान ground

badminton

बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त ( indoor game ) जागेमध्ये खेळला जाणारा खेळ असून हा खेळ एक आयताकृती कोर्टवर खेळला जातो. या कोर्टाचा आकार १३.४ मीटर बाय ५.१८ मीटर ( ४४ फुट बाय १७ फुट) असतो. प्रत्येक बाजूला जर २ खेळाडू असतील तर या कोर्टचा आकार १३.४ मीटर ते ६.१ मीटर ( ४४ फुट बाय २० फुट) असतो आणि कोर्टाच्या मध्य भागी १.५ मीटरचे ५ फट) जाळे असते त्याचबरोबर

बॅडमिंटन खेळासाठी लागणारी उपकरणे equipment's needed to play badminton

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी २ गोष्ठी महत्वाच्या सतत २ आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. हा खेळ खेळताना २ रॅकेटची गरज असते रॅकेट हे अंडाकृती असते आणि ते धातूपासून बनवलेले असते आणि त्याला खाली धरण्यासाठी एक मुठ असते आणि रॅकेटच्या मधी जे छोटे छोटे चौकोण असतात ते फायबरचे असतात. रॅकेटची लांबी साधारण ६५०ते ७०० मिलीमीटर आणि रुंदी २०० ते २३० मिलीमीटर असते आणि रॅकेटचा वापर शटलकॉकला मारण्यासाठी केला जातो. शटलकॉक बॅडमिंटनचे फुल किवा बर्डी या नावाने देखील ओळखले जाते. हे शटलकॉक दिसायला फुलासारखे असते आणि हे खूप लहान आणि हलके असते. शटलकॉक याला १६ पंख लावलेले असतात आणि हे ४ ते ५ ग्रॅम वजनाचे असते.

बॅडमिंटन खेळाचे नियम badminton

rules of

• या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि हा खेळ तीन भागामध्ये खेळला जातो.

• एखाद्या खेळाडूने सर्व्ह करण्यापूर्वी आपला प्रतिस्पर्धी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

• एका सामन्यात २१ गुणांच्या ३ सर्वोत्तम खेळाचा समावेश असतो

• शटलकॉक कोर्टाच्या हद्दीबाहेर मारू नये.

खेळाडूला नेटला स्पर्श करण्याची परवानगी

• शटलकॉकला रॅकेटने खाली मारू नये.

नसते.

सर्व्हरने शटलकॉक मारण्यापूर्वी सर्व्हर प्राप्त करणाऱ्या गटाने कोर्टवरील रेषांना स्पर्श करू नये.

• रॅली जिंकणारी गट त्याच्या गुणांमध्ये एक गुण जोडते.

• २० गुणांनंतर जो गट सर्वप्रथम २ गुण मिळवते तो गट खेळ जिंकतो.सर्व्ह होईपर्यंत दोन्ही खेळाडूंचे पाय स्थिर स्थितीत असणे आवश्यक आहे. यावेळी आपले पाय रेषेला स्पर्श करु शकत नाहीत.

खाली येणाऱ्या स्ट्रोकला

• प्रतिस्पर्ध्याच्या रोखण्यासाठी एखादा खेळाडू जाळ्याजवळ त्याचे रॅकेट धरु शकत नाही.

• बॅडमिंटन या खेळामध्ये चूक (फॉल ) केव्हा मनाला जातो सर्व्हरचे पाय सर्व्हिस कोर्टात नसतात किंवा जर

रिसीव्हरचे पाय सर्व्हरच्या विरुद्ध तिरपे

असतात.

• सर्व्हर जेव्हा तो सर्व्ह करतेवेळी पुढे सरकतो. • कोर्टाच्या हद्दीबाहेर उतरणारी, नेटच्या खाली किंवा त्याद्वारे जाणारी सेवा किंवा शॉट इतर कोणत्याही अडथळ्यांना किंवा खेळाडूंच्या शरीराला किंवा कपड्यांना स्पर्श करते.

खेळाडू किंवा कार्यसंघाकडून सलग दोनदा शटल मारणे.

Answered by siddiquafirdous2013
1

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

Similar questions