कोणत्या कारणामुळे वाहतुकीपाट जाळे निर्माण होते.
Answers
Answer:
परस्परांपासून दूर असलेल्या दोन स्थानांच्या दरम्यान माणसे, माल व वाहने यांच्या होणाऱ्या हालचालीला वा स्थलांतराला वाहतूक म्हणतात. वाहतूक नियंत्रणात या हालचाली पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल अशा प्रकारे जलद, कार्यक्षम व शक्य तितक्या सुरक्षित करण्याचा अंतर्भाव होतो. अशा तऱ्हेने वाहतूक नियंत्रणामध्ये एखाद्या मोठ्या शहरातील दाट गर्दीच्या रस्त्यांतून मोटारगाड्या, ट्रक, बस व पादचारी यांच्या होणाऱ्या हालचालींची योजना तयार करणे विमानाचे आरोहण, उड्डाण व अवतरण यांच्यासाठी मार्गनिर्देशन प्रणाली अभिकल्पित करणे (आराखडा तयार करणे) रेल्वे डब्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काटकसरीने हलवाहलव करणे आणि मालवाहू जहाजांकरिता मालाची यंत्राद्वारे हाताळणी करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. वाहनांची दाटी, प्रदूषण व अपघात ही अपुऱ्या वाहतूक नियंत्रणाची लक्षणे आहेत. वाहतूक नियंत्रण प्रणालींचे स्वरूप व जटिलता ही वाहन चालविणाऱ्याची प्रतिसादक्षमता, वाहनाचे स्वरूप, वाहतूक समस्येची तीव्रता व वाहतूक नियंत्रण प्रणालीपासून असलेल्या अपेक्षा यांवर अवलंबून असते.
नियंत्रित करावयाची वाहतूक ही प्रकार वा कार्यमान यांच्या बाबतीत जितकी संमिश्र (उदा., मोटारगाड्या, बैलगाड्या, सायकली, दुचाकी शक्तिचलित वाहने यांची संमिश्र वाहतूक) असेल, तितक्या वाहनांचा ओघ महत्तम ठेवण्याच्या व सुरक्षिततेची खात्री होण्याच्या दृष्टीने अधिक समस्या उद्भवतात. सामान्यतः विशिष्ट प्रकारांच्या वाहतुकीचे नियंत्रण विशिष्ट पर्यवेक्षक प्रतिनिधींद्वारे अंमलात आणले जाते आणि या प्रतिनिधींमध्ये स्पर्धा व नियमन यांबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रस्तुत नोंदीत रस्ता वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक व जल वाहतूक यांच्या नियंत्रणाच्या पद्धती व समस्या यांची माहिती क्रमवार दिलेली आहे.
रस्ता वाहतूक नियंत्रण
खालील वर्णन प्रामुख्याने मोटारगाड्यांच्या वाहतूक नियंत्रणासंबंधी केलेले असले, तरी जनावरांनी ओढावयाच्या गाड्या, रिक्षा, सायकली, मोटारसायकली, स्कूटर वगैरे दुचाकी वाहने, ट्रॅक्टर ट्रेलर यांसारख्या वाहनांनाही ते थोड्याफार फरकाने लागू आहे.
इतिहास: वाहतुकीची दाटी हे शहरी जीवनाचे एक लक्षण म्हणून किमान रोमन काळाइतक्या पूर्वीही आढळत होते. ही दाटीची परिस्थिती बऱ्याचदा कडक नियंत्रण उपाययोजना करण्याइतपत वाईट असे. याचे मूलभूत कारण आताप्रमाणेच सदोष नगररचना हे होते. अशा रचनेत शहराच्या सर्व भागांतील वाहतूक मध्यवर्ती चौकात येईल अशी रस्त्यांची मांडणी करण्यात येत असे. इ. स. पहिल्या शतकात जूलिअस सीझर यांनी रोममध्ये चाकांच्या वाहनांच्या वाहतुकीस दिवसाच्या काळात बंदी केली व ही योजना पुढे क्रमाक्रमाने प्रांतांमधील शहरांनाही लागू केली. इ. स. पहिल्या शतकाच्या अखेरच्या काळात सम्राट हेड्रिअन यांना रोममध्ये प्रवेश करणाऱ्या गाड्यांच्या संख्येवर मर्यादा घालणे भाग पडले.
मध्ययुगाच्या प्रारंभी व्यापाराचा ऱ्हास झाल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न सौम्य झाला परंतु मध्ययुगीन शतकातील यूरोपीय शहरांतील वाहतुकीच्या गर्दीचा प्रश्न इतका तीव्र बनला की, काही विशिष्ट रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई उद्भवली आणि ती विसाव्या शतकातील नागरी उद्योगप्रधान समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण समस्याच ब
Explanation:
कोणत्या कारणामुळे वाहतुकीपाट जाळे निर्माण होते