Environmental Sciences, asked by sushanthreddy6610, 1 month ago

कोणत्या रोगांमुळे रातांधळेपणा येतो?

Answers

Answered by nimmalakafle9
0

Answer:

अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात.दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे. डोळ्याच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. या रासायनिक बदलांना शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेले तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत. या रंगद्रव्याला ‘दृग्‍नीलारुण’ (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात व त्यावरील विक्रियेकरिता अ जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची न्यूनता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते.

Similar questions