कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते ?
Answers
Answered by
30
Answer:
कुसूम या झाडापासून लाख तयार केली जाते.
Answered by
2
लाख म्हणजे लाल रंगाचा पदार्थ होय. लाख एक किडीपासून मिळणारा पदार्थ आहे, ही कीड पिंपळ, वड, बोर, कुसुम, खैर, पळस ह्या वर्गातील इतर झाडांवर ही कीड असते. ती आकारामध्ये खूप छोटी असते व परपोशी असते. वृक्षांचा रस ती सोशून घेते व आपल्या लाळेचा द्रव्य सोडत जाते, ही लाळ जेव्हा कडक होते तेव्हा तिला लाख असे म्हणतात.
अनेक उद्योगांमध्ये लाखेचा वापर केला जातो. लाखेच्या बांगड्या व खेळण्या खूप पूर्वीपासून राजस्थानमध्ये बनवल्या जातात. लाखेचा उपयोग दस्तावेज सीलबंद करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जंगलामध्ये लाख जास्त करून मिळते. भारतात लाखेचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण भारतात खूप जंगलं आहेत.
Similar questions