कोणत्या वर्षानंतर भारतात जमातवादी राजकारणाचा प्रभाव वाढू लागला
Answers
Explanation:
२०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशात हिंसा आणि जमातवादाने उच्चांक गाठला. गेल्या काही वर्षांत धर्मांधतेच्या विरोधात भूमिका घेणारे, सांस्कृतिक विविधता आणि बहुलतावादाचा पुरस्कार करणारे विवेकवादी विचारवंत, पत्रकार, साहित्यिक-कवी-कलाकार, वैज्ञानिक यांना धमक्या, हल्ले आणि खुनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सामाजिक माध्यमांतून नियोजनपूर्वक ट्रोलिंग होते आहे. जात, धर्म, वंश, भाषा अशा मुद्द्यांवर आधारित विद्वेष पसरवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दलित, अल्पसंख्याक व स्त्रियांवरील अत्याचार, गोरक्षणाच्या नावाखाली हत्या यातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संघ परिवार आणि भाजपचे पदाधिकारी, मंत्री जाहीरपणे संविधान विरोधी वक्तव्ये करत आहेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे आता हे सारे राष्ट्रवादाच्या नावाखाली केले जात आहे. एका बाजूला मानववंशशास्त्रज्ञ हे ठामपणे सांगताहेत की, आज जगातील कोणताही वंश स्वत:ला विशुद्ध मानू शकत नाही. भौगोलिक एकात्मता, वंश, धर्म, भाषा, संस्कृती यावर आधारित ऐक्य आणि सामाईक इतिहास या सर्व अटी पूर्ण करणारे एकही राष्ट्र आज या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही. स्थलांतर, युद्धातील जय-पराजय, वसाहतवाद यामुळे सर्वच राष्ट्रे मिश्रवंशीय बनली आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘शुद्ध हिंदुत्वाचा नारा’ हे एक राजकीय अस्त्र बनले आहे. हिंदुत्ववाद ही एक राजकीय परिभाषा बनली आहे.
भौगोलिक, आर्थिक ऐक्य आणि सामाईक इतिहास हे राष्ट्र म्हणून भारतीय लोकांना जोडणारे घटक आहेत. विशेषत: हजारो वर्षांचा सामाईक इतिहास हा आपला सर्वांत दृढ, सामर्थ्यशाली बंध आहे. गेल्या दहा हजार वर्षांत या भूमीवर मध्य व पश्चिम आशिया, पश्चिम युरेशिया, तिबेट-बर्मा अशा विविध प्रदेशांतून आर्य, मंगोलियन, कुशन, शक, ग्रीक, हूण, अरब, पर्शियन, तुर्क अशा वंशांचे लोक स्थलांतरित होऊन आले. इथेच स्थिर झाले. इथल्या लोकांत मिसळून गेले. गेल्या हजार वर्षांत इथे संत आणि सुफींनी सहिष्णुता, सुसंवाद आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण केले. जेव्हा हिंदू आणि मुस्लीम राजे सत्तेसाठी लढत होते, तेव्हा सर्वसामान्य एकलोक परस्परांचा विद्वेष न करता एकत्र राहत होते. इतिहासात कधी शासक असलेले इथले मुस्लीम हिंदूंप्रमाणेच वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या शोषणाचे बळी होते. तेही स्वातंत्र्यलढ्यात उतरले. इतकेच नव्हे तर भारतातील मुघल साम्राज्याचा अखेरचा शहेनशहा व नामांकित उर्दू शायर बहादुर शाह ज़फर (१७७५-१८६२) याने १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध सैन्याचे नेतृत्व केले. युद्धात हार झाल्यानंतर इंग्रजांनी त्याला बर्मा (आताचे म्यानमार) येथे पाठवले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास हिंदुस्तानात घेता यावा आणि आपल्या जन्मभूमीवर दफन व्हावे अशी बहादुर शाह ज़फरची अंतिम इच्छा होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. “कितना है बदनसीब ‘ज़फर’ दफ्न के लिए, दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार (प्यार की गली) में॥” या त्याच्या काव्यपंक्ती आजही त्याचे भाव व्यक्त करतात.