Economy, asked by satishkhonde7, 2 months ago

• कोणत्या वस्तू उपभोक्त्यांना वारंवार उपयोगात
आणता येतात?​

Answers

Answered by samfernando342
1

Answer:

मार्केटिंग). वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया. ‘विपणन’ या संकल्पनेचा अर्थ विपनन कार्याशी संबंधित घटकांना वेगवेगळ्या प्रकारे अभिप्रेत असतो. विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.

प्रसिद्ध अमेरिकन विपणनतज्ञ फिलिप कोटलर यांच्या मते विपणन ही विनिमय-प्रक्रियांच्या माध्यमातून मानवी गरजा व आवश्यकता यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने केली जाणारी कृती होय. वास्तविक विपणन ही एकच कृती नसून अनेक क्रियांची ती एकीकृत साखळीप्रणाली आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. पुरवठ्याची योजना तयार करण्यापासून, ते वस्तूंचे व सेवांचे वितरण करण्यापर्यंत अनेक कार्यांचा समावेश विपणनामध्ये होतो.

ग्राहक हे विपणन कार्याचे मुख्य लक्ष्य असते, त्यामुळे ग्राहकांच्या गरजांचे स्वरूप समजावून घेणे, त्यानुसार वस्तू व सेवा यांचा पुरवठा करून ग्राहकांना अपेक्षित समाधान मिळवून देणे, तसेच जाहिराततंत्राचा प्रभावी वापर करून नवीन गरजा निर्माण करणे, ह्याला विपणन कार्यात महत्त्व असते. त्या दृष्टीने व्यवसाय संघटनेची धोरणे, कार्यक्रम व व्यूहरचनेची आखणी करणे व सुयोग्य संघटनामार्फत त्यांची अंमलबजावणी करणे याचा विपणन कार्यात समावेश होतोच, शिवाय ग्राहकांच्या क्रय-प्रेरणांचा शोध घेणे, त्यांचा परिमाणात्मक व गुणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून अर्थ लावणे, हेदेखील विपणन कार्यात अपेक्षित असते.

औद्योगिक क्रांतीममुळे आर्थिक व्यवस्थेत अनेक मूलभूत स्वरूपाचे व दूरगामी परिणाम करणारे बदल घडून आले. संपूर्णपणे बदललेले उत्पादनाचे तंत्र, उत्पादनात यंत्रांचा केला जाणारा जास्तीत जास्त वापर, मोठ्या प्रमाणावर केले जाणारे मागणीपूर्व उत्पादन, उत्पादक व ग्राहक ह्यांच्यामधील प्रत्यक्ष संपर्काचा अभाव, ग्राहकांच्या गरजा व क्रय-प्रेरणा ह्यांच्याबद्दलची अनभिज्ञता, बाजारपेठाचे जागतिक स्वरूप, बाजारपेठांना प्रभावित करणाऱ्या विविध घटकांचे अस्तित्व इ. कारणांमुळे विपणनाचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे बनलेले आहे. हे गुंतागुंतीचे कार्य पुढील तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडले जाते.

एकत्रीकरण : (ॲसेंब्लिंग). वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, उत्पादन एका ठिकाणी तर त्यांचा उपभोग अन्य ठिकाणी होत असतो. त्यामुळे उत्पादक व उपभोक्ते यांचा परस्परांशी असणारा संबंध हा भिन्न मध्यस्थामार्फतच अप्रत्यक्षपणे येत असतो. उत्पादित वस्तूंना एकत्र करून त्यांना बाजारपेठेत प्रवाहित करावे लागते. त्यासाठी एकाच व्यवस्थापनाखाली वा नियंत्रणाखाली त्या गोळा कराव्या लागतात. तसे करताना वस्तूंची खरेदी-विक्री, त्यांची वाहतूक, साठवण व त्यासाठी आवश्यक असणारा अर्थपुरवठ या सर्व कार्यात असणारी जोखीम स्वीकारणे, वस्तूंची प्रतवारी ठरविणे इ. कार्ये करावी लागतात. त्यांचाही विपणन कार्यात अंतर्भाव होतो.

Similar questions