Social Sciences, asked by arjuntate671, 1 month ago

केप्लरचे ग्रहांच्या गतिविषयक तीन नियम आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा​

Answers

Answered by parthsonawane2002
1

Answer:

मंगळाचे निरीक्षण व सखोल अध्ययन केल्यावर त्यांना या कल्पना सुचल्या. ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार नसून विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) आहेत व या विवृत्ताच्या एका नाभीशी सूर्य असतो, ही एक कल्पना होय. दुसरी कल्पना म्हणजे ग्रह व सूर्य यांना जोडणारी रेषा ठराविक काळात विवृत्ताचे सारखेच क्षेत्र व्यापते (म्हणजे कक्षेमध्ये सूर्याजवळ जाताना ग्रह अधिक वेगाने फिरत असतो) ही होय. या कल्पना म्हणजेच केप्लर यांचे पहिले दोन प्रसिद्ध नियम होत. १६१५ साली ⇨ कलनशास्त्राला चालना देणारा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला.१६१८ साली तीन धूमकेतूंचा अभ्यास करून त्यांनी De Cometis (१६१९) हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते धूमकेतू सरळ रेषेत जातात ते परत येत नाहीत आणि धूमकेतूची शेपटी हा, तो विरळ होत असल्याचा आणि सूर्य त्याला दूर ढकलत असल्याचा पुरावा होय. १६१८ व १६२०-१६२१ दरम्यान खंडशः प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी ग्रहांसंबंधीचे नियम गुरूच्या उपग्रांनाही कसे लागू पडतात हे दर्शविले आहे. Epitome astronomiae Copernicanae (१६१८–१६२१) या ग्रंथात केप्लर यांनी कोपर्निकस यांच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचे विवरण केले आहे. कोपर्निकस यांच्या मतांना उघड पाठिंबा देणारे ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणजे केप्लर हेच होत. या ग्रंथावर पोप यांनी बंदी घातली होती. ग्रहांचे आवर्तकाल (सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेस लागणारा काल) आणि सरासरी अंतरे यांच्यातील संबंध दर्शविणारा केप्लर यांचा तिसरा नियम त्यांच्या De Harmonice Mundi (१६१९) या ग्रंथात आहे. त्यामध्ये सूर्यकुलाच्या संरचनेचे साध्या आकडेवारीने स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यांनी मांडलेल्या तीन नियमांचा ग्रहपंचांगे तयार करण्यासाठी त्यांनीच प्रथम वापर केला आणि त्याकरिता लॉगरिथमाचा वापर केला. त्यासंबंधीचा Chilias Logarithmorum हा त्यांचा ग्रंथ १६२४ साली प्रसिद्ध झाला. Tabulae Rudolphinae हे तक्ते त्यांनी १६२९ साली पूर्ण केले. त्यांमध्ये प्रणमन व लॉगरिथम यांचे तक्ते व १,००५ ताऱ्यांची यादी ही आहेत. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ग्रहांची स्थाने काढण्यासाठी हे तक्ते वापरीत. बुधाच्या अधिक्रमणासंबंधी (सूर्यबिंबावरील सरकण्यासंबंधी) लिहिलेला त्यांचा ग्रंथ १६०९ साली प्रसिद्ध झाला होता. शिवाय त्यांनी १६२९ साली बुधाच्या अधिक्रमणाबाबत केलेले भाकीत १६३१ साली खरे ठरले.

Explanation:

hope it helps you

Similar questions