कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते?
Answers
कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय
बाळाला एक ते दिड वर्षे स्तनपान करणे.
बाळाला पहिल्या दिवशी पासुन वेळेवर दुध पाजणे.
सहा महिन्यांनंतर लगेचच स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराला सुरुवात करावी.
दोन मुलांमधील अंतर कमीत कमी तीन वर्ष असावे.
मुलाचे सर्व लसीकरण वेळेवर करावे.
अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित दयावा.
दंडाचा घेर कुपोषणासाठी उपयोगी तपासणी
एक वर्षावरील मुल चेहऱ्यावरून व हातापायावरून कितीही मोठे दिसत असले तरीही त्याच्या दंडाच्या मध्यभागी मोजपट्टीने घेतलेला घेर १३ सें.मी. च्या खाली जर घेर असेल तर कुपोषण गंभीर प्रकारचे आहे.
अंगावरच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न नसणारी मुले कित्येक वेळा दिसायला गुटगुटीत दिसली तरी सुद्धा ती कुपोषणाच्या सीमारेषेवर असतात. जुलाब, किंवा सर्दीचा एखादा सौम्य आजार देखील त्याला कुपोषित करतो. मुल सशक्त आहे की कुपोषित आहे हे समजून घेण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांचे वजन दर महिन्याला घेणे हा होय.