कापड हा
कोणत्या कच्च्या
मालापासुन तयार होतो
Answers
Answer:
विणलेल्या कापडावर शोभादायक आकृतिबंधक (नक्षी) तयार करण्याच्या पद्धतीला कापड छपाई असे म्हणतात. छपाईत कापडाच्या मूळ रंगापेक्षा एक किंवा अधिक रंग वापरण्यात येतात.⇨रंजनक्रिया ही छपाईहून भिन्न आहे. रंजनक्रियेत कापडाचे मूळ धागेच एकसारखे रंगवून मग ते विणण्यात येतात किंवा विणलेले कापडही रंगवतात. तर कापड छपाईत तयार कापडावर निराळी नक्षी उठवतात. कापड छपाईसाठी ठसा, जाळी व रूळ या पद्धतीने मुख्यत: वापरण्यात येतात.
कापडाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी बहुंताशी रंगीत असतात. पांढऱ्या कापडापेक्षा एकरंगी कापडाचे आकर्षण अधिक व बहुरंगीचे त्याहूनही अधिक असते. बहुरंगी कापड बनविण्याच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे आहेत : (१) बहुरंगी विणकाम, (२) कशिदा, (३) गाठी मारून केलेले गालिचे आणि (४) कापड छपाई. यांतील पहिल्या तीन प्रकारांत रंगीत सुताचा वापर होतो आणि चौथ्या म्हणजे कापड छपाई पद्धतीत कापड रंगीत दिसण्यासाठी निराळे रंगीत सूत वापरत नाहीत व या तीनही पद्धतींपेक्षा ही सोपी असते. या प्रकारात पांढऱ्या किंवा रंगीत कापडावर मर्यादित जागी रंग लावून किंवा असलेला रंग काढून नक्षी निर्माण करण्यात येते. यामुळे कापडाची मूळ वीण कशी आहे त्यावर नक्षी अवलंबून असत नाही व कित्येक वेळा हलक्या दर्जाच्या कापडावर आकर्षक छपाई केल्यास त्याला चांगली किंमत येते. कापड छपाई हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे.
रंग मर्यादित जागेत लावायचा असल्यामुळे त्याच्या विद्रावात विशिष्ट प्रकारचे गोंद मिसळून दाटपणा वाढविला जातो. अशी लापशी (पेस्ट) कापडावर लावल्यानंतर ती न पसरता, लावली असेल तेथेच राहते. रंग व गोंद यांशिवाय लापशीमध्ये इतरही रसायने घातलेली असतात.
इतिहास : ऐतिहासिक कागदपत्रांवरून आणि पुराणवस्तू संशोधनावरून असे दिसते की, भारतामध्ये कापड छापण्याची कला फार पुरातन कालापासून चालू आहे, परंतु सोळाव्या शतकापूर्वीचे छापील कापड आता फारसे सापडत नाही. मोहें-जो-दडो येथील उत्खननावरून इ. स. पू. ३००० वर्षांपासून भारतामध्ये कापसापासून तयार केलेले साधे छापील कापड तयार होत होते असे दिसते. परंतु खडीच्या पद्धतीने कापड छापण्याची कला सतराव्या शतकात तुर्कस्तानातून भारतात आली असावी असे वाटते. सन १६०० ते १८०० या कालात भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत छापील कापड तयार करण्याचा धंदा फार मोठ्या प्रमाणावर चालू होता व तो माल डच, इंग्लिश व फ्रेंच व्यापाऱ्यांच्या मार्फत सुरत व कालिकत बंदरांतून इंग्लंड व इतर यूरोपीय देशांत जात असे. या कापडावरचे रंग पक्के व भडक तेजस्वी असत त्यामुळे ते कापड तिकडे फार लोकप्रिय झाले होते. यंत्रयुग सुरू झाल्यानंतर इंग्लंड व फ्रान्समध्ये कापडाच्या मोठ्या गिरण्या सुरू झाल्या व तेथे भारतातील कापडाप्रमाणेच उत्तम प्रतीचे छापील कापडही तयार होऊ लागले. त्यामुळे या लोकांनी भारतीय मालावर बहिष्कार घातला आणि तेव्हापासून भारतातील कापड छापण्याच्या उद्योगाला अनेक अडचणी येऊ लागल्या व तो धंदा खालावत गेला. १९४८ नंतर भारतातील अनेक उद्योगपतींनी पुन्हा दीर्घ प्रयत्न केल्यामुळे भारतातही कापड छापण्याच्या गिरण्या निघाल्या व त्यांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे छापील कापड तयार होऊ लागले आणि ते पुन्हा परदेशांत खपू लागले. अहमदाबाद आणि मुंबई येथील काही गिरण्या छापील कापडाबद्दल प्रसिद्ध आहेत.
Explanation:
कापड हा आपल्याला दैनंदिन जीवनात लागतो. कापड हे बनवण्याचे काम ही खोप मोठे आहे . कापड सर्वात आधी कापसा पासून तयार होते. फक्त कापूस नव्हे तर कापड रेशम चा किद्या पासून मिळाल्या ला रेशमा पासून ही बनतो.