२) कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियममध्ये असतात.अ) घटनापत्रकब) नियमावली क) महितीपत्रक
Answers
Answer:
कंपनी व निगम कायदे
प्रस्तावना
कंपनी कायदा
कंपनीचे प्रवर्तक
निर्देशपत्रिका
कपनीचा संस्थापन-समयलेख
संस्थापन-नियमावली
भांडवल
भाग
सदस्य
ऋणपत्र
कंपनीच्यासभा
लाभांश
संचालक
हिशोबतपासनीस
कंपनीचेपरिसमापन
प्रस्तावना
निगमन म्हणजे कायद्याने केलेली निगमांची संस्थापना.हे कायद्याचे एक कल्पित आहे.कल्पित व्यक्ती मानावयाची ,तिला विशिष्ट नाव द्यावयाचे ,तिच्या नावे संपत्ती प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीत्या ठेवावयाची ,तिच्या नावाने तिच्या संपत्तीतून व्यापार वा उद्योगधंदा करावयाचा.कायद्याप्रमाणे नफा-तोटा अशा कल्पित व्यक्तीच्या संपत्तीचा भाग मानला जातो. या कल्पित व्यक्तीचे सर्व व्यवहार संबंधित व्यक्तींनीच करावयाचे असतात. ही कल्पित व्य क्ती म्हणजेच निगम.ज्या निगमाचे सर्व व्यवहार एका वेळी एकच व्यक्ती करू शकते, त्या निगमास एक-निगम म्हणतात. राजा हा एक-निगम आहे, असे इंग्लंडात मानतात. एका वेळी एकच राजा राज्य करू शकतो. तो मेला ,तरी राजा हा निगम कायमच असतो व दुसरा राजा राज्याभिषेकानंतर त्या निगमाचे प्रत्यक्ष व्यवहार करू लागतो. इंग्लंडात ‘ राजा मृत झाला ,राजा चिरायू होवो’ असे म्हणतात, त्यावेळी राजा हा निगम कायम राहो, असाच अर्थ असतो. एक-निगमांची अशी अनेक उदाहरणे आहेत.व्यक्ती येवो किंवा जावो एक-निगम कायम राहतो.
शंकराचार्य ,अॅडमिनिस्ट्रेटर -जनरल व बिशप हीसुद्धा एक-निगमांची उदाहरणे आहेत.ज्या निगमांच्या व्यवहारांत अनेक व्यक्तींना भाग घ्यावा लागतो, त्यांस समूह-निगम म्हणतात. समूह-निगमाचे तीन प्रकार आहेत : (१) सांविधिक निगम ,(२) राजाच्या सनदेवरून स्थापन झालेले निगम. उदा. ,इंग्लंडच्या राणीने दिलेल्या सनदेनुसार स्थापन झालेली पूर्वीची ईस्ट इंडिया कंपनी (३) संस्थापकांच्या इच्छेने स्थापन झालेले निगम.समूह-निगमांपैकी जे निगम सांविधिक असतात ,ते संबंधित विषयाबद्दल अगर व्यवहाराबद्दल केलेल्या कायद्यानुसार अस्तित्वात येतात.उदा. ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ,स्टेट बँक ऑफ इंडिया ,इंडियन एअर लाइन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया.हे सर्व निगम तद्विषयक कायदा करून स्थापन झालेले निगम आहेत.सांविधिक निगमासच विशेषतः निगम ही संज्ञा भारतात योजिली जाते.