Math, asked by hpayal3411, 1 year ago

कार्बनी संयुगांची सविस्तर माहिती मिळवा

Answers

Answered by Nitinsingh192
14

Answer:

कार्बनी सिंथेसिस ही कार्बनी संयुगे निर्माण करण्याची पद्धत आहे. कार्बनी अभिक्रिया करून कार्बनी संयुगे निर्माण करण्याशी संबंधित आहे.

काही सोपी कार्बनी संयुगे तयार करणे

१. एसेटानिलाइड

ग्लेशियल असेटीक आम्लाच्या उपस्थितीत एनिलीन आणि असेटीक अॅन्हायड्राइड यांचे एसेटायलिकरण होते आणि एसेटानिलाइड निर्माण होते. एनिलीन किंवा फिनायलमिन हे एक प्राथमिक अमिन आहे, आणि त्याचे रेणु सूत्र आहे C6H5NH2. हे आम्लधर्मी असते. असेटीक अॅन्हायड्राइड हे असेटीक आम्लाचे एक अॅन्हायड्राइड असते आणि एसाइल गटाचे स्रोत असते. असेटीक अॅन्हायड्राइड आणि एनिलीन ह्यांची केंद्राकर्षी प्रतियोजन अभिक्रिया होते. असेटीक अॅन्हायड्राइड आणि एनिलीन ह्यांच्या अभिक्रियेला एसेटायलिकरण म्हणतात. या अभिक्रियेत एनिलीन केंद्राकर्षी वागते आणि असेटीक अॅन्हायड्राइड चे एसाइल गट (CH3CO-) हे इलेक्ट्रॉनस्नेही वागते. इथे, -NH2 गटात हायड्रोजन अणुच्या ऐवजी एसाइल गट येते.

Similar questions