क्रीडामहोत्सव निबंध मराठी
Answers
Answer:-
केंद्रीय विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव
देवळाली कॅम्प : विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती, उत्साह आणि मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते. त्याचप्रमाणे अंगी शिस्त बानल्यास खेळामध्ये देखील प्रगती साधता येत असल्याचे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर पी. रमेश यांनी केले. केंद्रीय विद्यालय क्रमांक १ मध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवादरम्यान ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. कार्यक्रमास कर्नल यश बालीदेखील उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास करत उपस्थितांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी मशाल मैदानातून फिरवीत क्रीडा महोत्सव सुरू झाल्याचे जाहीर केले. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायामासह योग प्रकार सादर केले. त्यांच्यासाठी लिंबू चमचा, १०० व २०० मीटर धावणे आदींसह विविध क्रीडाप्रकार सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता सिंह आभार वरिष्ठ शिक्षक डी. पारकर यांनी व्यक्त केले.
Hope it's help You❤️