India Languages, asked by prasid2892003, 1 year ago

क्रीडामहोत्सव निबंध मराठी ​

Answers

Answered by IBoss
55

खेळाडू आणि क्रीडा रसिकांचे लक्ष असलेला ठाणे महानगरपालिकेचा कला-क्रीडा महोत्सव २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ५१ लाखांची बक्षिसे दिली जाणार असून पाच हजार खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. क्रीडा रसिकांना त्यानिमित्त विविध देशी खेळांचा थरार आणि कलांचा अविष्कार अनुभवायला मिळणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्यावतीने महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षीपर्यंत या क्रीडा स्पर्धा शहरात विविध भागात आणि वेगवेगळ्या कालावधीत होत असत. मात्र, विविध खेळांचा एकत्रित आविष्कार क्रीडा रसिकांना अनुभवता यावा, यासाठी कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. पुढील आठवड्यात या स्पर्धांचा थरार ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवाचा समारोप संगीत कला क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण शहरात उत्साही वातावरण राहावे, यासाठी आकर्षक जाहिरात, कला-क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह तसेच कला-क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या प्रतिकृती लावण्यात येणार आहेत.

गुणवत्तेला संधी

व्हॉलीबॉल (गावदेवी मैदान), चित्रकला स्पर्धा (दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह) बॅडमिंटन स्पर्धा (खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल), मल्लखांब स्पर्धा (श्री घंटाळी मैदान) पॉवरलिफ्टींग स्पर्धा (शाळा क्र. ९, कोपरी), कॅरम स्पर्धा (शाळा क्र. २३, किसननगर), कबड्डी स्पर्धा (तेंडुलकर क्रीडा संकुल) टेबल टेनिस स्पर्धा (दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह), बुद्धिबळ स्पर्धा (टिपटॉप प्लाझा) अॅथलेटिक्स स्पर्धा (दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह), खो-खो स्पर्धा (धर्मवीर क्रीडा संकुल, कोपरी), कुस्ती स्पर्धा (शिवाजी मैदान), जिम्नॅस्टिक (शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुल, ढोकाळी, सरस्वती विद्यालय, राबोडी), जलतरण स्पर्धा (रहेजा कॉम्प्लेक्स), शरीरसौष्ठव स्पर्धा (होतकरू मित्र मंडळ), सायकल स्पर्धा (तीन हात नाका), क्रिकेट स्पर्धा (सेंट्रल मैदान) येथे होणार आहेत. त्याशिवाय छायाचित्र प्रदर्शन, संगीत भजन, ब्रास बँड रांगोळी, पाककला, नृत्य, निबंध, कथाकथन, एकपात्री, वक्तृत्व, सुगम संगीत, लघुचित्रपट, पथनाट्य अशा अनेक स्पर्धा या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आल्या आहेत.

Mark as brainliest

Answered by anjumraees
1

Answer:

क्रीडामहोत्सव निबंध.

Explanation:

क्रीडामहोत्सव निबंध.

स्पोर्ट्स डेमध्ये अनेक शाळांमध्ये अशा कार्यक्रमांचा समावेश असतो ज्यामध्ये विद्यार्थी क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेतात. ते सहसा ट्रॉफी किंवा बक्षिसे जिंकण्यासाठी सहभागी होतात. बर्‍याच प्राथमिक शाळा त्यांच्या कॅम्पसमध्ये दरवर्षी क्रीडा दिवस ठेवतात. स्पोर्ट्स डे निबंधाद्वारे, आम्ही या दिवशी काय होते ते पाहू.

माझी शाळा दरवर्षी स्पोर्ट्स डे आयोजित करते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होतो. प्रत्येक वर्षी, सर्व वर्ग प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या कलाकृती सादर करतात. वर्गानुसार, कृती निवडल्या जातात.

उदाहरणार्थ, कनिष्ठ वर्ग एरोबिक्स सारखी साधी कृती करतात तर वरिष्ठ वर्ग पिरॅमिड तयार करणे, लांब उडी आणि बरेच काही यासारखी कठीण कृती करतात. माझ्या शाळेतील क्रीडा दिन पूर्ण तयारीनिशी होतो.

विद्यार्थ्यांना त्यांची कृती परिपूर्ण करता यावी यासाठी दोन महिने आधीच तयारी सुरू होते. क्रीडा दिनानिमित्त सरावासाठी आम्हाला अतिरिक्त वेळ मिळतो. हे काही शैक्षणिक अभ्यास कमी करण्यास देखील मदत करते ज्याचा सर्वांना आनंद होतो.

आपण सर्वजण सूर्यप्रकाशात सराव करतो आणि आपल्या हालचाली चोख करण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या दिवशी, आम्ही सर्व आमच्या पालकांना आमचा अभिनय पाहण्यासाठी आमंत्रित करतो. पालक उत्साहाने येतात आणि त्यांची मुले इतर विद्यार्थ्यांसोबत सामंजस्यपूर्ण कामगिरी करताना पाहतात आणि चित्रित करतात.

शिवाय, मॅरेथॉन आणि वॉकथॉन देखील आहेत जे पाहणे खूप मनोरंजक आहे. हे घरांच्या विभाजनाच्या आधारावर घडते. माझ्या शाळेत सर्वाधिक विजय ब्लू हाऊसने मिळवले आहेत.

अशा प्रकारे, आपण सर्वजण आपल्या क्रीडा दिनी खूप आनंद घेतो आणि आपल्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सादर करतो. आमच्या स्पोर्ट्स डेला नेहमी एक प्रमुख पाहुणे आमंत्रित केले जाते जे त्यांच्या उत्साहवर्धक शब्दांनी समारंभाचे उद्घाटन आणि समारोप करतात.

Similar questions