History, asked by newareraju20, 9 months ago

(५) क्रीडा पर्यटन' म्हणजे काय?​

Answers

Answered by tarjulevinay
2

Explanation:

उत्तर: (१) खेळामध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळाचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे 'क्रीडा पर्यटन होय. विसाव्या शतकात क्रीडा पर्यटन हा नवा प्रकार उदयास आला आहे.

(२) स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरत असतात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात. आतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल व हॉकी स्पर्धा दरवर्षी होतात.

(३) विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होतात दर चार वर्षांनी विविध देशात एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या जातात. हिमालयीन कार रैली, महाराष्ट्र व हिंद केसरी कुस्तीस्पर्धा अशाही स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू, मार्गदर्शक पंच, स्पर्धांचे आयोजक आणि प्रेक्षक या सर्वांचे होणारे पर्यटन क्रीडा पर्यटनात मोडते

Similar questions