Math, asked by bhaktibhavanasales, 8 months ago

काेराेनाची कारणे व परिणाम मराठीत​

Answers

Answered by vaishnavi6267
0

Step-by-step explanation:

कोरोनाची लागण ज्या नागरिकांना झाली, त्यांना याची माहिती लगेचच समजत नाही. मात्र, ताप, खोकला आणि श्वसनात अडचणी येणे यासारखी लक्षणे कोरोनाची आहेत. या व्हायरसची लागण झाली की नाही याची लक्षणे पाचव्या दिवशी किंवा त्या पुढील दिवशी दिसली होती. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणे असल्याचे समजायला पाच दिवसांचा अवधी लागत असल्याचे वैज्ञानिकांच्या अभ्यासातून सिद्ध होत आहे.

कोरोनाची लक्षणे काय?

कोरोनाची लागण झाली हे कसे ओळखावे असा प्रश्न जर पडला असेल तर ते ओळखणेही सोपे आहे. त्याची लक्षणं सामान्य आहेत. यामध्ये ताप येणे, घशाला कोरड, अंग दुखणे आणि सर्दी होणे ही मुख्य लक्षणे आहेत.

12 दिवसांपर्यंत व्हायरसची लक्षणे दिसली नाहीतर...

ज्या व्यक्तीला 12 दिवसांपर्यंत कोरोनाची लक्षणे दिसली नाही तर अशा व्यक्तीला त्यानंतर अशी लक्षणे दिसण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र, अशा व्यक्तीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

काही व्यक्ती असू शकतात कोरोनाचे वाहक

ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा बहुतांश व्यक्तींना अतिशय अल्प स्वरुपाचा आजार होतो. काही व्यक्ती संसर्गाच्या वाहक असू शकतात. त्या व्यक्तीला असिमप्टमॅटटिक असे म्हणतात. या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत.

वृद्धांसाठी धोकादायक

आधीच कुठला आजार असलेल्या वृद्धांसाठी कोरोना व्हायरसची लागण होणे हे गंभीर ठरू शकते. अशा व्यक्तींसाठी कोरोना व्हायरस अतिशय गंभीर आणि प्राणघातकही ठरू शकतो.

काय करावे?

कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीही घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हात स्वच्छ धुवावेत. योग्य मास्क वापरावा, कोणतेही अन्न खाताना ते शिजवून खावे. तसेच कोणतीही शंका, भीती वाटत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

hope the answer is helpful

mark me as a brainliest and

follow me..

Answered by pathakambar60
0

Answer:

य्त्र्र्र्र्फ्र्क्फिफ्क्षुईइक्षुद्दुफुद्द्य्दुदीड़fiifif

Similar questions