India Languages, asked by mrlengend9909, 2 months ago

कोरोनाचे संकट या विषयावर निबंध लिहा​

Answers

Answered by ItzURHailey
0

Here is ur Answer ⤵️

Everything available in our environment which can be used to satisfy our needs, is called a resource. It should be technologically accessible, economically feasible and culturally acceptable. Only then, it can be termed as a 'Resource'. Examples: minerals, forests, fossil fuels etc

Hope it helps you ✔

Answered by dipakmandaltutu1973
2

सध्या देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाने जीवनातील सर्वच क्षेत्रांबाबत नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. समाजातील सर्वच स्तरातील, सर्वच व्यवसायातील लोकांसमोर या संकटाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील पीढीसमोर देश स्वतंत्र करण्याचे ध्येय होते. वैद्यकीय सुविधा अद्ययावत नसल्याने अनेक रोगांच्या साथी त्या काळात फैलावत. देश-विदेशातही आरोग्य सेवेबाबत अशीच परिस्थिती होती. त्यानंतर देश स्वतंत्र झाला, हळुहळू देशाने मोठी प्रगती केली. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत महामारी किंवा महासंकट म्हणावे असे प्रसंग देशावर आले नाहीत. अपवाद, पाकिस्तान आणि चीन युद्धांचा आणि दुष्काळाचा, पण त्यावर देशातील जनतेने संयमाने, धैर्याने मात केली. मात्र, आज उद्‌भवलेल्या कोरोना नामक विषाणूच्या भयाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले असल्याचे चित्र आहे. त्यातही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे शिक्षणक्षेत्रात कोरोनामुळे काय बदल घडले, काय बदल घडू शकतात, विद्यार्थ्यांनी या संकटाच्या घडीला धैर्याने सामोरे कसे जावे, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, शालेय आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत काही सूचना करण्याचा हा प्रयत्न.

Similar questions