कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल ?
Answers
Answer:
कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जागतिक साथीमुळे जगण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र, स्वतःला आणि आपल्यापासून इतरांनाही या विषाणूची लागण होऊ नये, यासाठीचे काही खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. WHO ने हे उपाय अवलंबण्याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. हे उपाय अवलंबले तर तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता.
काय आहेत हे उपाय, जाणून घेऊयात…
स्वतःचा बचाव कसा कराल?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितल्याप्रमाणे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठीच्या उपायांपैकी सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत उपाय म्हणजे स्वच्छता राखणे.
साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ आणि वारंवार धुवा. यामुळे तुमच्या हातावर असलेले विषाणू निष्क्रीय होतात.
कोरोना
वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
वाचा- लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
वाचा- कोविन अॅपवर नोंदणी न करता लस कशी घ्यायची?
वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
वाचा- कोव्हिडमधून बरं झाल्यावरही दुर्लक्ष नको, डॉक्टर काय काळजी घ्यायला सांगताहेत?
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपले हात बऱ्याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल?
खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. टिश्यू पेपर नसेल तर कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा.
वापरलेला टिश्यू तात्काळ कचरापेटीत टाका. खोकताना किंवा शिंकताना अशाप्रकारे तोंडावर किंवा नाकावर टिश्यू पेपर ठेवला तर विषाणू पसरणार नाहीत आणि इतरांना त्यांची लागण होणार नाही.
शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ नये, यासाठीच दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटर अंतर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
अत्यावश्यक कामं नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी असते. घराबाहेर पडल्यावर कुणाशीही हस्तांदोलन करू नका. त्याऐवजी हात हलवून, वाकून नमस्कार किंवा हात जोडून नमस्कार करा, असं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेलं आहे.
plz mark as brainlist