कोरोनाच्या काळात स्वच्छतेचे महत्व
nibandh
Answers
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधात स्वच्छतेचे महत्व व त्याचे फायचे , स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना, स्वच्छतेविषयी नागरीकांनी उचलण्याची पावले याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला.
निबंध मराठी क्रमांक 1 (391 शब्दात)
माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.
वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे.
आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्हा आपल्या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्या स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्वच्छता राखण्याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्याने आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील.
जर आपण घरात अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्या घरात शिरून रोगराई पसरविण्याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्यात आपले पैसे व वेळ दोन्ही वाया जातात. घरात स्वच्छता असली व घरात एखादा पाहुणा आल्यास तो घरातील स्वच्छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्वच्छता नसेल तर ती अस्वच्छता कोणालाच आवडणार नाही. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.
Explanation:
स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता करणे हे सरकारचे काम आहे म्हणुन ते स्वत: काहीच करत नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकार सोडुन मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढुन रोगराई वाढण्यास मदत होते. प्रत्येक भारतीयांने आपआपल्या वैयक्तीेक पातळीवर स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला पाहीजे. तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही ६० टक्याहुनही अधिक लोक बाहेर शौचास जाणे या सवयीमुळे विविध प्रकारच्या आजारास कारणीभुत ठरत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दुर ठेवण्यासाठी स्वच्छता खुप महत्वाची ठरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदींजीचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.