कोरोनाच्या सुट्टी चे दिवस निबंध
Answers
कोरोनाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसत आहे, आता शिक्षण विभागावरही शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याची वेळ आली आहे, याबद्दल आज मोठी घोषणा करण्यात आली आहे.
School and colleges in maharashtra will be shut due to coronavirus govt declares school shut
मुंबई : सध्या जगभरात थैमान घातलं आहे ते कोरोना व्हायरसने, कोरोनाच्या भीतीने सर्वच घटकांवर परिणाम झालेला आहे. सध्याचा महिना हा मार्च म्हणजेच महाराष्ट्रातील परीक्षांचा महिना. कोरोनाचा शिक्षण विभागावरसुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाला आज प्रस्ताव देण्यात आला आणि तो शासनाकडून मंजूरही करण्यात आला आहे. राज्यातील शाळा आणि विद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घातलं आहे. या परिपत्रकानुसार सर्व नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत शाळा, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
राज्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार आहेत. या शाळा आणि महाविद्यालय मात्र शहरी भागातील आहेत, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू असतील. शाळांसोबतच अंगणवाड्याही बंद राहतील आणि आयटीआय कोर्सेसदेखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.