कोरोना काळात बोर्डच्या परिक्षा
निबंध
Answers
Explanation:
मॅडम आमचा काहीच अभ्यास झालेला नाही. ऑनलाईनमध्ये काहीच कळालेलं नाही. त्यात मला कोरोनाची लागण झाली आणि मी नापास झालो तर..." बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेल्या शिवम पालने बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या मनातील भीती व्यक्त केली.
शिवम पाल मुंबईतील झुनझुनवाला कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकतो. अकरावीतून बारावीत प्रवेश घेण्याआधीच गेल्यावर्षी लॉकडॉऊन लागू झाला. महाविद्यालयातून बारावीत प्रवेश तर मिळाला पण वर्षभर केवळ मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेतल्याने विषयांचं पुरेसं आकलन करता आलेलं नाही, अशी त्याची तक्रार आहे.
तो म्हणाला, "आम्ही परीक्षेसाठी तयारच नाही. ऑनलाईनमध्ये काहीही कळालेलं नाही. कोणत्याही विषयाचं प्रात्यक्षिक वर्षभरात झालेलं नाही. त्यात कोरोनाची लागण होण्याची भीती. मी नापास झालो तर ही भीती सतत मनात आहे."
औरंगादमध्ये सैनिक शाळेत बारावीत शिकणारा गजानन बिमरोत याचीही अशीच प्रतिक्रिया आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्याने सांगितलं, "ग्रामीण भागात राहत असल्याने ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित झालेलं नाही. गुणवत्ता शिक्षण मिळू शकलेलं नाही. नेटवर्कमुळे शिकण्यात सारखा व्यत्यय येत होता. त्यामुळे अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही."
ऑनलाईन शिक्षणाचा असाही फटका, ऐन परीक्षेआधी मुलांना 'ही' भीती
ऑनलाईन शाळा किती उपयोगी?
इंग्रजी शाळांमध्ये मराठीतून शिक्षणाविषयी नेमकं काय धोरण आहे?
कोरोनाचे संक्रमण तर सुरूच मग राज्यात शाळा कधी सुरू होणार?
"कुटुंबालाही आमची खूप काळजी वाटते. परीक्षा देताना कोरोनाची लागण झाली तर याला कोण जबाबदार असेल? आमची शिक्षणमंत्री मॅडमला विनंती आहे की त्यांनी परीक्षा पुढे ढकलावी."
"आताच्या परिस्थितीत परीक्षा दिली तर नापास होण्याची खूप भीती आहे. टक्केवारी कमी होण्याची भीती आहे. प्रत्यक्षात कॉलेजमध्ये शिकणे आणि ऑनलाईन शिकणे यात खूप फरक आहे. जिथे आम्हाला विषयाची जाण नाही तिथे परीक्षा कशी द्यायची," असा प्रश्नही गजानन यांनी उपस्थित केला.