कोरोना काळातील आमचा अभ्यास या विषयावर निबंध लिहा.
Answers
Answer:
कोरोना आरोग्य संकटात समाजव्यवस्थेत मोठे बदल पहायला मिळत आहेत. खरंतर संपूर्ण जगातच जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले. दैनंदिन गोष्टीतही मोठे बदल पहायला मिळत आहेत. डिजिटल म्हणजेच ऑनलाईन शाळा हा त्यापैकीच एक.
शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारे लहान मुलं दिसतात. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेले दिसतात.
त्याचे फोटो सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही ही व्यवस्था नवीन आहे. पण याची खरंच गरज आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
डिजिटल शाळा भरते कशी?
डिजिटल शाळेचे अनेक प्रकार आहेत. मुख्यत: शाळेचं काम हे झूम या अॅपवरून चालतं. त्याच्या सोबतीला व्ह़ॉट्स अॅप, इमेल, विविध अॅप या सोयी आहेतच. केशव शिंदे सोलापूरमध्ये सुयश गुरुकुल नावाची संस्था चालवतात. पहिली ते बारावी असलेली ही शाळा सध्या डिजिटल स्वरुपात गेली आहे. सध्या या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग झूमवर सुरू असतात.
याबद्दल माहिती देताना त्यांनी म्हटलं, "या संकटाच्या काळात शाळा कशी चालवायची याची आम्ही फार तयारी केली नव्हती आम्ही झूम डाऊनलोड केलं. गुगल मीटिंग ट्राय केलं. एक महिना झाला आता. 22 मार्चपासून आम्ही ही शाळा सुरू केली. त्यात बारावी NEET, च्या विद्यार्थ्यांना शिकवलं. आमच्या शिक्षकांनाही फारशी माहिती नव्हती.
ही परिस्थिती किती काळ राहील याची कल्पना नाही त्यामुळे आम्ही आमच्या शिक्षकांना उत्तम ऑनलाईन शिक्षक होण्याचं आवाहन केलं. आम्ही बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. ज्याच्याकडे लॅपटॉप आहे त्यांच्यावरून स्क्रीन शेअर कशी करायची हे आम्ही शिकलो. तसंच गुगल बोर्डचा वापर शिकून घेतला. त्यामुळे नोट्स लिहायला मदत झाली. त्याचा फायदा झाला. ऑनलाईनची खरंतर गरजच नाही. फक्त नीटला बसणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. मुलांना स्क्रीन मोठी पाहिजे. मुलं बोलत नाही. व्हीडिओ ऑफ करतात. बोला म्हटलं तरी बोलत नाही. सारखं त्यांना आवाज येतो का हे विचारण्यात वेळ जातो. टीव्हीवरून ही सगळी व्यवस्था फार उत्तम होऊ शकते."
Explanation:
please mark me as brainliest