कोरोनाळायरस झपाट्याने पसरतोय
यावर बातमीलेखन करा.
answer only if know
Answers
Answer:
नवी दिल्ली, 30 मार्च : भारतात (India) 24 तासांत तब्बल 92 कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) रुग्ण आढळून आलेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांचा आकडा आता 1071 वर पोहोचला आहे, तर एकूण मृतांची संख्या 29 झाली आहे. कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. भारतात आता कोरोनाव्हायरसचं अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं सांगितलं जातं आहे, त्यामुळे भारताचा धोका वाढला आहे.
एकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या लोकल ट्रान्समिशन आणि अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात (local transmission and limited community transmission) आहे, असं म्हटलं आहे. म्हणजेच भारतातील कोरोनाव्हायरस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे.
दरम्यान देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबईनंतर पुण्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनीदेखील कोरोनाव्हायरसचा अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचा सूचक इशारा दिला आहे, ते म्हणाले, "कोरोनाव्हायरसचं अंशत: संक्रमण झालं आहे, त्यामुळे काळजी घ्या. घराबाहेर पडू नका"
Explanation: