कोरोना नंतर शाळेचा पहिला दिवस
Answers
Answer:
कोरोनामुळे (Coronavirus) बंद असलेल्या राज्यातील शाळा (Maharashtra School) तब्बल दीड वर्षांनंतर सुरु झाल्या आहेत. आजपासून राज्यातील शाळांची घंटा वाजली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरु (School Reopen in Maharashtra) करण्यास सरकारने (Maharashtra Government) परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस (First day of school) आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमांसह अधिकाऱ्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यासोबत या परिपत्रकामध्ये सरकारने काही नियम दिले आहेत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाइन संवाद (online interact) साधणार आहेत.