India Languages, asked by kiara7579, 1 month ago

कोरोना संकट ह्या विषयावर निबंध​

Answers

Answered by darksoulknight4321
4

Explanation:

कोरोनाला लवकरात लवकर रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. सरकार आणि प्रशासन आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. त्यांचे प्रयत्न विफल ठरू न देण्यासाठी आपण आपले वैयक्तिक कर्तव्य पार पाडणे तितकेच अनिवार्य आहे. बाहेर पडू नका, घरातच बसा, निदान एवढे जरी केले तरी आपण माणुसकी दाखवल्याचा, लोकांचे प्राण वाचवल्याचा, या संकट काळात सेवाधर्म निभावणाऱया लोकांना सहाय्य केल्याचा, देश सावरल्याचा अभिमान बाळगू शकू.

कोरोनाबाधितांपैकी बहुतेकांमध्ये या विषाणूची लागण झाल्याची लक्षणे आढळलीच नव्हती. त्यामुळे कुणी जरी स्वस्थ व निरोगी दिसत असला तरी त्याला या आजाराची बाधा झाली नसल्याचे अनुमान करणे धोकादायक ठरू शकते. स्पर्शानेच काय, पण सहवास, सान्निध्यातदेखिल या विषाणूचा संसर्ग होतो. यातच याच्या जलद प्रसाराची भीतीदायक वास्तविकता दिसून येते. गेल्या शंभर दिवसांपासून थैमान घालत असलेल्या या कोविड-19 विषाणूंनी आजतागायत जगभरातील एक लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हे आकडे रोज हजारोंनी वाढत आहेत. त्यातच या विषाणूला नष्ट करणारी लस किंवा औषधे रुग्णांच्या इलाजासाठी उपलब्ध होण्यास कमीतकमी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. या विषाणूची लागण होऊच न देण्याची दक्षता घेणे, हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे व त्याप्रमाणे प्रत्येकजण काळजी घेत असल्याचे बघायला मिळत आहे. कुणामुळे आपला आणि आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ नये या जबाबदारीच्या जाणिवेतून स्वतःला स्वखुशीने घरातच रोखून धरणे, हेच या महामारीने निर्माण केलेल्या आपत्तीत प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हीच खरी माणुसकी असणार आहे.

या विषाणूच्या जीवघेण्या दहशतीमुळे रात्रीही न झोपणारी शहरं आज दिवसादेखील ओस पडलेली पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण आपापल्या घरात स्वतःला जगापासून दूर ठेवण्यात व बंदिस्त राहण्यातच सुरक्षित मानत आहेत. प्रत्येकाला आपला जीव व परिवार सर्वात प्यारा असल्याकारणाने सगळ्यांनी स्वखुशीने स्वतःला परिवारासह लॉकडाऊन केल्याचे दिसते. एकीकडे स्वतःचे आरोग्य व जीव सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा खटाटोप होत असताना दुसरीकडे काही असेही आहेत जे दुसऱयांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा आणि कळतनकळत आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी सेवा करताना दिसत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल व मेडिकल कर्मचारी, पोलीस, प्रसारमाध्यमातील लोक, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा देण्यासाठी कार्यरत कर्मचारी आणि अनेकविध सेवाभावी संस्था, त्यांचे कार्यकर्ते ही जोखीम पत्करून कोरोनाविरुद्धच्या लढय़ात योगदान देत आहेत. त्यांना आपल्या सुरक्षेची व प्राणांची पर्वा नाही का, तर नक्कीच आहे, पण त्यांच्यासाठी सेवाधर्म सर्वोच्च आहे आणि म्हणूनच अशा भयावह व धोकादायक वातावरणातदेखील त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामासाठी झोकून दिले आहे. हे माणुसकीच्या दृष्टीने अनन्यसाधारणच नव्हे तर श्रेष्ठ आहे.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉक डाऊन करण्याचा वेळीच घेतलेला निर्णय स्तुत्य होता. यामागील उद्देश व अपेक्षा एवढीच होती की, प्रत्येकाने या टाळेबंदीच्या काळात घरातच बसावे, अत्यावश्यकता नसताना बाहेर न पडणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, स्वच्छता राखणे, कोरोनाची लक्षणं जाणवताच स्वतःहून पुढे येऊन यासंबंधीचा खुलासा सरकारच्या वैद्यकीय यंत्रणेकडे करणे. बहुतांश जनतेची वर्तणूक ही एका जबाबदार नागरिकप्रमाणे सरकारला सहाय्य करणारी होती व आहे. परंतु काहींचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा अथवा नियमांचे उल्लंघन करून दाखविण्याचा फाजिलपणा सरकारी प्रयत्नांवर पाणी फेरताना दिसत आहे. या बेशिस्तीचादेखील संसर्ग वाढत आहे, हे आणखी गंभीर आहे. याच अनुकरणातून लोक भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत, विनाकारण बाहेर फिरत आहेत, धार्मिक स्थळांवर जमत आहेत आणि अनुशासन तोडण्याचे धाडस करीत आहेत. यातून निर्माण होणारा धोका स्वतःला, परिवाराला व संपर्कात येणाया प्रत्येकाला घातक ठरू शकतो याची अजूनही साधी जाणीव न होणे हेच दुर्दैव व मोठे आव्हान आहे. देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची लोकसंख्या, घनता आणि त्यात मुंबईतील त्याचे विस्फोटक प्रमाण लक्षात घेता हा प्रादुर्भाव वणव्याप्रमाणे पसरू शकतो, ज्याची ठिणगी धारावी, वरळी कोळीवाडा यांसारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांत पडल्याची भीती आहे.

Similar questions