Hindi, asked by virkarshreyas, 6 hours ago

कोरोना विषाणुने जगात माजवलेल्या हाहा:काराबाबत बातमी तयार करा. ​

Answers

Answered by ydavtamanna1032009
1

Answer:

कोरोनाच्या साथीला कारणीभूत असणारा SARS-CoV-2 विषाणू हवेतून पसरतो, असं सांगणारे प्रबळ पुरावे असल्याचं लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

कोरोनाचा हा विषाणू ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे बाधित व्यक्ती खोकलली किंवा शिंकली किंवा बाधित पृष्ठभागाला स्पर्श केल्यास कोरोनाची लागण होते, असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र, लॅन्सेटचा हा रिपोर्ट या समजाला तडा देणारा आणि म्हणूनच महत्त्वाचा आहे.

यूके, यूएस आणि कॅनडातल्या सहा तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालानुसार केवळ खोकला किंवा शिंकेद्वारे नाही तर बाधित व्यक्ती बोलली, ओरडली, गाणं म्हटलं किंवा तिच्या श्वासोच्छावासाद्वारेसुद्धा हा विषाणू पसरू शकतो, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याने तो वेगाने पसरतोय आणि मास्क वापरा, शारीरिक अंतर पाळा, हात सतत धुवा, सार्वजनिक आरोग्यासंबंधी हे जे उपाय सांगितले गेले त्यातून विषाणू प्रसाराला फारसा आळा घालता आलेला नाही, असं या रिपोर्टचं म्हणणं आहे.

Please make me the brainlist

Answered by wwwsarasgujar
0

Answer:

Explanation:

वुहान, 31 जानेवारी: चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना महामारीमुळे (Corona in Wuhan) संपूर्ण जगाला मोठा फटका बसला. अजूनही अनेक देशांमध्ये कोरोनामुळे नागरिकांचा मृत्यू होत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगात कोरोना व्हायरस कसा पसरला याचा शोध सुरु केला आहे. डब्ल्यूएचओची टीम चीनच्या वुहान प्रांतातील त्या रुग्णालयात दाखल झाली आहे ज्याठिकाणी पहिल्या कोरोना रुग्णांवर सर्वात आधी उपचार करण्यात आले होते.

शुक्रवारी डब्ल्यूएचओच्या टीमने वुहानमधील रुग्णालयाला भेट दिली. याठिकाणी डब्ल्यूएचओची टीम कोरोना विषाणूच्या संबंधित कसून चौकशी करत आहे. चीनच्या म्हणण्यानुसार याठिकाणी एका वर्षापूर्वी कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करण्यात आले होते. त्यानुसासार डब्ल्यूएचओच्या टीमने त्याच ठिकाणावरुन तपासाला पहिली सुरुवात केली आहे.

कोरोना कसा पसरला यावर तपास सुरू

जगामध्ये कोरोनाचा प्रसार कसा झाला? याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेने हाती घेतले आहे. वुहान प्रांतातील रुग्णालयाला भेट देण्यापूर्वी डब्ल्यूएचओच्या टीममधील काही सदस्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली. डब्ल्यूएचओची टीम येत्या काही दिवसांमध्ये वुहान प्रांतातील बऱ्याच ठिकाणांचा दौरा करणार आहे. हॉलंडचे वैज्ञानिक मारियन कूपमान्स यांनी सकाळी ट्विट करत सांगितले की, 'चीनला आल्यानंतर डब्ल्यूएचओच्या टीमला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा क्वारंटाइचा कालावधी संपला.'

Similar questions