कोरोना या महामारीवर तुमच्या भाषेत निबंध लिहा .
Answers
जानेवारी.. फेब्रुवारी… मार्च… आता फक्त दोन महिने राहिले होते आणि मग उन्हाळी सुट्टी चालू होणार होती.
सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचं मनामध्ये आधीच तयार झाली होती. इतक्यात टीव्ही वरती एक बातमी सारखी झळकू लागली. “जागतिक कोरोना महामारी”, “भारतात कोरोनाचा शिरकाव” सुरवातीला या बातमीची काहीच भीती वाटली नाही. पण थोड्याच दिवसात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढू लागली की सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करावा लागला. सर्वजण आप आपल्या घरी बंद झाले. शाळा बंद झाली, ऑफिस बंद झालं, त्यामुळे सगळे खूप खुष झाले. रोज वेगवेगळ्या रेसिपी तयार होऊ लागल्या. कॅरम, पत्ते, बुद्धिबळाचे डाव रंगू लागले. जुने फोटो खेळणी यांची शोधाशोध सुरू झाली.
सुरवातीला खूप धमाल केली. परंतु नंतर घरामध्ये कोंडून ठेवल्या सारखं वाटू लागलं. मित्रांची भेट न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागलं होत. एका जागी घट्ट बांधून ठेवल्यासारख वाटू लागलं. यानंतर खूप भयानक परिस्तिथी झाली. लोकांना खाऊच्या आणि रोजच्या वापराच्या वस्तू आणण्यासाठी सुद्धा बाहेर पडणं अवघड झालं. जे रोजकामाई करून खाणारे लोक होते त्यांना पोटभर अन्न मिळणे सुद्धा मुश्किल होऊन गेलं. पण अश्या परिस्थितीत सुद्धा पोलीस लोकांच्या सुरक्षेसाठी आणि डॉक्टर लोकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र खंबीरपणे कोरोनाशी लढा देत होते.स्वतःच्या आरोग्याची कोणतीच काळजी न करता जनतेच्या सेवेसाठी हे लोक गुंतून गेले होते. या अशा भयंकर परिस्थितीमध्ये कोणताही देव मदतीला नव्हता तर पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स,सफाई कामगार,शेतकरी हे लोकचं देव बनले होते.