Hindi, asked by ym8274971, 1 month ago

कोरोणा व्हायरस व कोरोना लस यांच्यातील संवाद कल्पना करून लिहा .

Answers

Answered by mad210216
53

संवाद लेखन.

Explanation:

  • कोरोना व्हायरस व कोरोना लस यांच्यातील संवाद:

  • लस: काय रे वायरस? लोकांचे जीव घेताना तुला जरा ही वाईट नाही वाटत का?
  • वायरस: अगं लस, मी तरी काय करणार? लोकं मला रोखण्यासाठी सावधानीची पाऊले उचलत नाहीत. त्यात माझी काय चुकी?
  • लस: पण, आता लोकांनी मला घेतल्यावर मी तुझ्यापासून त्यांचे रक्षण करणार.
  • वायरस: पण, लोकं तर तुला घ्यायला घाबरतात. मग त्यांना माझ्यापासून रक्षण कसे मिळेल?
  • लस: हळूहळू सगळी लोकं माझ्यावर विश्वास दाखवून मला घेतील आणि तुझ्यापासून संरक्षण मिळवतील.
  • वायरस: मला कोणीच थांबवू शकणार नाही.
  • लस: नाही. माझ्या वापराने, औषधं व सावधानीची पाऊले उचलून लोकं नक्कीच तुला हरवू शकणार.
  • वायरस: ठीक आहे. बघूया कोण कोणाला हरवते.
  • लस: एक दिवस नक्कीच तुझा अंत होईल, हे लक्षात ठेव.
Similar questions