कार्यालयीन संस्थांमध्य कौणत्या घटकांचाजो समावेश होतो
Answers
Answer:
कार्यालय व्यवस्थापन : कोठल्याही संस्थेच्या कार्यालयाकडे सोपविलेली कामे त्वरेने, व्यवस्थितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडली जावीत, यासाठी केलेल्या कार्यालयीन कामाच्या व्यवस्थेची अंमलबजावणी म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन होय. व्यापारी कार्यालयाकडे सोपविण्यात येणारी कामे मुख्यतः संस्थेच्या व्यापारी व्यवहारांचे स्वरूप व त्यांचा विस्तार, कायद्यांतील तरतुदी आणि संस्थेच्या दैनंदिन गरजा यांच्यावर अवलंबून असतात. कार्यालयीन कामांचे स्वरूप कार्यालयागणिक वेगवेगळे असले, तरी ती कामे हातावेगळी करण्याच्या कार्यक्षम पद्धती अनुभवांती रूढ होतात व सामान्यत: सर्व कार्यालयांतून वापरल्या जातात. या पद्धतींचा अवलंब करुन व नवीन कार्यक्षम पद्धती शोधून काढून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यालय व्यवस्थापन सतत प्रयत्न करीत असते. ज्या प्रमाणात हे व्यवस्थापन यशस्वी होईल, त्या प्रमाणात वस्तू किंवा सेवा यांच्या उत्पादनखर्चातील व्यवस्थापनखर्चाचा अंश कमी होऊन उपभोक्त्यांचा फायदा होईल.
सर्वसाधारणपणे व्यापारी कार्यालयाच्या व्यवस्थापनात खालील दहा कार्याचा समावेश होतो : (१) नोंद-पुस्तके ठेवणे (२) पत्रव्यवहार (३) कागदपत्रांचे जतन (४) कामाची योग्य आखणी व वाटणी (५) कार्यपद्धती ठरविणे (६) आधुनिक उपकरणांचा व यंत्राचा उपयोग (७) उपकरण-साठा व योग्य वाटप (८) जनसंपर्क (९) कर्मचाऱ्यांवर देखरेख व (१०) कर्मचारी प्रशासनाची व्यवस्था. या कार्यांच्या तपशिलावरुन कार्यालय व्यवस्थापनाची व्याप्ती आणि त्याचे महत्त्व समजण्यास मदत होते.