क्रियाविशेषणाचे किती प्रकार आहेर
Answers
Answer:
5. क्रियाविशेषण अव्यय
क्रिया पदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण अव्यययाचे काही प्रकार:
१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
३) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
४) परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
६)निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय
१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यामधील क्रिया नेमकी कोठे घडली म्हणजेच ठिकाण किंवा स्थळ दर्शवणारा जो शब्द असतो त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
दोन प्रकार पडतात:
अ) स्थितीदर्शक:-
उदाहरणे. खाली , वर , जेथे , तेथे , मध्ये , अलीकडे , पलीकडे इत्यादी .
i) तो खाली बसतो.
ii) तेथे बसू नका.
ब)गतिदर्शक:- वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजेच गतिदर्शक
उदाहरणे. खालून , दुरून , तुकडून , लांबून , वरून , जवळून इत्यादी
i) आकाश नेहमी वडाच्या झाडा जवळून जातो.
ii) तो कुत्र्याला लांबून भाकरी टाकतो.