कारखाना भेट देणारे अहवाल लेखन मराठीत
Answers
Answer:
दिनांक- ४ जानेवारी २०२२
ठिकाण- औरंगाबाद एम आय डी सी
वेळ -सकाळी ११ ते दुपारी २
इयत्ता -दहावी
सरस्वती विद्यालय औरंगाबाद येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची औरंगाबाद एमआयडीसीतील व्हिडिओकॉन या कंपनीला भेट देण्यात आली होती.
शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही सर्व विद्यार्थी सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात जमा झालो. त्यानंतर दहा वाजून ४५ मिनिटांनी शाळेच्या बसमधून आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक व्हिडिओकॉन कंपनी जवळ पोहोचलो. कंपनीतील व्यवस्थापकाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लहान गटात विभागले. गटानुसार विद्यार्थ्यांसोबत त्या कारखान्यातील एका व्यक्तीची नेमणूक केली. सदर व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याठिकाणी तयार होणारे रेफ्रिजरेटर व टेलिव्हिजन संच कसा निर्माण होतो त्याविषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक दाखवले.
शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा खूप वेगळा अनुभव होता. पुस्तकांतून घेतलेले ज्ञान व प्रत्यक्षात त्या वस्तू कशा बनतात हे कारखान्यात जाऊन बघणे हा अनुभव सर्वांसाठी खूप आनंदाचा होता.
सर्व विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळाले होते आणि ते त्या कारखान्याच्या व्यवस्थापकांचे व शिक्षकांचे आभार मानत होते. व्यवस्थापकाने दिलेल्या सर्व माहितीची नोंदी सर्व विद्यार्थी आपल्या वहीमध्ये करत होते.
तेथील कामगारांशी बोलल्यानंतर त्यांचे दैनंदिन कामकाज कसे असते त्याबद्दल माहिती मिळाली. दुपारी तीन वाजता आम्ही परत कारखान्याच्या दरवाजाजवळ आलो व आपल्या गाडीतून बसून पुन्हा शाळेकडे रवाना झालो. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव खूप मोलाचा ठरला.
कारखाना भेट देणारे अहवाललेखन मराठीत