२) कारखान्याच्या क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करा.
Answers
Answered by
12
Answer By Amit
उत्तर : कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली :
( १ ) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
( २ ) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते?
( ३ ) कारखान्यात कार्यरत असणा - या कामगारांची एकूण संख्या किती ?
( ४ ) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ?
( ५ ) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो ?
( ६ ) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो ?
( ७ ) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते ?
( ८ ) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?
Please mark as brainliest thankyou
Similar questions