India Languages, asked by kalasarechhaya, 4 days ago

क्रम : खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा. - संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ मुद्दे संत तुकडोजी महाराज पूर्ण नाव काळ प्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध सुवचन एखादा अभंग​

Answers

Answered by dikshachavan258
9

Answer:

संत ज्ञानेश्वर (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; संंजीवन समाधी : आळंदी, इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ → मत्स्येंद्रनाथ → गोरक्षनाथ → गहिनीनाथ → निवृत्तिनाथ → ज्ञानेश्वर

संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या कार्याचे आध्यात्मिक उत्तराधिकारी मानले जाणारे, महाराष्ट्रातील एक महान संत होते. संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) हे लोकांना जागृत करण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक पराक्रमासाठी तसेच धर्मरक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी परिचित होते.

ज्ञानदेवांनी स्थापलेल्या वारकरी संप्रदायामधील संत एकनाथ हे एक संत होते. संत एकनाथ भक्ती आणि आध्यात्मावर लिहिलेल्या असंख्य स्तोत्रे आणि पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात प्रसिद्ध भगवद्गीताचे आध्यात्मिक सार, एकनाथी भागवत आणि त्यांचे विशाल भव्य रामायण यांचा समावेश आहे.

तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

उदासोनि काय होते । उदासोनि काय होते । कोण देईल आयते ? करा करा संतसंग । वेळ गेल्या नये रंग ॥ पुढे काय होय कोणा । कोण जाणे याच्या खुणा ? तुकड्या म्हणे कर्तव्याने । फेडा देहाचे पारणे ॥

It's helpful to you...

please mark me as brainliest

Similar questions