History, asked by smitadandegavkar, 1 month ago

३. कारने लीहा । (१) शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले?​

Answers

Answered by Sauron
20

Explanation:

प्रस्तावना :

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. केवळ महाराष्ट्राचा भाग नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही भागांचा यामध्ये समावेश होतो.

अष्टप्रधान मंडळ :

श्री शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे काम सोपे आणि सोयीस्कर होण्यासाठी आठ लोकांची आठ खात्यांमध्ये नियुक्ती केली. राज्यकारभार सोयीस्कर व्हावा यासाठी आठ खात्यांमध्ये विभागून त्यासाठी प्रत्येकी एक प्रमुख नेमण्यात आला. या आठ खात्यांच्या आठ प्रमुखांनी मिळून अष्टप्रधान मंडळ बनले.

प्रमुखाची निवड करणे मधून करणे या सर्वांचा अधिकार महाराजांना होता.

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ :-

1). मोरोपंत त्रिंबक पिंगळे - प्रधान

2). रामचंद्र नीलकंठ मुजुमदार - अमात्य

3). अण्णाजी दत्तो - सचिव

4). दत्ताजी त्रिंबक वाकनीस - मंत्री

5). हंबीरराव मोहिते - सेनापती

6). रामचंद्र त्रिंबक डबीर - सुमंत

7). निराजी रावजी - न्यायाधीश

8). मोरेश्वर पंडितराव - पंडितराव

Similar questions