२) कारण लिहा.
म्हातारीला आनंद झाला.paragraph :-
अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. 'पोस्टमन इन द माऊंटन' हे त्याचं
नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम
करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला; पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन
वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान
वाड्या-वस्त्या पायी चालत हिंडायच्या, हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं.
एका वस्तीवर दोघं बाप-लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते.
प्रोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद
भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं
आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार
असल्याचं, त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं.
Answers
Answered by
2
Answer:
म्हातारी जरी अंध असली तरी तिला माहित होतं की तिथे पोस्टमन पत्र घेऊन आला आहे. कारण म्हातारीच्या मुलानं तिला पत्र पाठवलेलं असतं म्हणून म्हातारीला आनंद होतो.
Similar questions