कारणे लिहा.
(१) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
(२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद् आक्रमक पवित्रा घेतला.
Answers
Answer:
किल्ले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशीवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही,हे दिलेरखानाला माहीत होते. आणि त्यामुळेच दिलेरखानाने पुरंधरला वेढा दिला होता. दिलेरखानाची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. आणि त्याच्याजवळचे सैनींक मोठे शूर गडी होते. हे सगळे शूर सैनिक घेऊन मुरारबाजी लढाईसाठी उभा राहिला. दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. आणि तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले,परंतु मुरारबाजी व त्याचे सैन्य बाजूला हटले नाहीत,उलट ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. आणि माचीचा बुरुज ढासळला. तेवढ्यात मुघल माचीवर घुसले. आणि दिलेरखानाने माची जिंकली. नंतर मराठ्यांनी वरच्या माचीचा आधार घेतला. आणि ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून हि लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. मुरारबाजीने पाचशे मावळे निवडले.
Answer:
पुरंधरचा तह:
पुरंदरचा तह (मराठी: पुरंदर चा तह) 11 जून 1665 रोजी मुघल साम्राज्याचा सेनापती जयसिंग पहिला आणि शिवाजी यांच्यात झाला. जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातल्यानंतर शिवाजीला करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. मुघल साम्राज्याशी युद्ध केल्याने आपल्या साम्राज्याचेच नुकसान होईल आणि आपल्या माणसांचे मोठे नुकसान होईल हे शिवाजीला समजले तेव्हा त्याने आपल्या माणसांना मुघलांच्या अधिपत्याखाली सोडण्याऐवजी तह करणे पसंत केले I
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद् आक्रमक पवित्रा घेतला. :
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली कारण. पुरंदरच्या तहाचे जे नुकसान झाले ते सर्व भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दख्खनच्या प्रदेशावर आक्रमण करून मुघलांना अस्थिर ठेवण्यासाठी सुसज्ज सैन्य पाठवून किल्ले ताब्यात घेण्याची त्यांची रणनीती होती.