किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय
Answers
Answer:
Explanation:
काही विशिष्ट मूलद्रव्यांच्या अणुगर्भांच्या (अणुकेंद्रांच्या) अस्थिरतेमुळे स्वयंप्रेरित विघटन (फुटण्याची क्रिया) होते आणि त्यामुळे काही किरणांचे वा कणांचे उत्सर्जन होते, या आविष्काराला किरणोत्सर्ग म्हणतात. रॉंटगेन यांच्या क्ष-किरणांच्या शोधानंतर (१८९५) थोड्याच महिन्यांत १८९६ मध्ये आंत्वान आंरी बेक्रेल यांना किरणोत्सर्गाचा शोध आकस्मिकपणे लागला. अनुस्फुरण (एखाद्या पदार्थाने एखाद्या विशिष्ट तरंगलांबीच्या प्रारणाचे म्हणजे तरंगरूपी ऊर्जेचे शोषण करून जास्त तरंगलांबीच्या प्रारणाचे उत्सर्जन करणे) या आविष्काराबद्दल संशोधन करीत असताना बंद पाकिटात ठेवलेल्या छायाचित्रण काचा व बोहीमियामधील पिचब्लेंड या युरेनियम ऑक्साइडयुक्त खनिजाचा संबंध आला होता; या काचा धुतल्या असता त्या काळ्या झालेल्या बेक्रेल यांना आढळून आल्या, साहजिकच या पिचब्लेंडमध्ये असलेल्या युरेनियमच्या पारगामी (आरपार जाणाऱ्या) किरणांमुळे असे झाले असले पाहिजे असा बेक्रेल यांनी तर्क केला व या प्रकारास त्यांनी किरणोत्सर्ग हे नाव दिले. सुरुवातीच्या संशोधनावरून या किरणोत्सर्गाचे मूळ अणुगर्भाशी निगडित असून या आविष्कारावर रासायनिक विक्रियांचा तसेच भौतिकीय परिस्थितीचा काहीही परिणाम होत नाही असे आढळले.
सॉरबॉन येथील विद्यार्थी प्येअर क्यूरी व मारी क्यूरी यांनी किरणोत्सर्गाचे कारण शोधून काढण्याचे काम अंगावर घेतेले व त्याचे पर्यवसान म्हणून प्रथम पोलोनियम आणि नंतर रेडियम या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा शोध लागला.
किरणोत्सर्गाच्या क्रियेमध्ये अणुगर्भाचे विघटन होऊन त्याचे दुसऱ्या प्रकारच्या अणुगर्भात रूपांतर होत असते असे रदरफर्ड आणि सॉडी या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. अणूचे अस्थैर्य हे किरणोत्सर्गाचे कारण असते आणि असे अस्थिर अणू निसर्गात सर्वसाधारणपणे अणुक्रमांक (अणुगर्भातील प्रोटॉनांची संख्या) ८२ ते ९२ पर्यंत आढळतात. रदरफर्ड यांचा दुसरा शोध म्हणजे अणुगर्भाचा. अणूचा प्रकार आणि त्याचे रासायनिक गुण हे अणुगर्भावरच अवलंबून असतात. रदरफर्ड यांचा तिसरा एतद्विषयक शोध म्हणजे उत्सर्जित किरण तीन प्रकारचे असतात हो होय. हे तीन प्रकार म्हणजे (१) आल्फा (α) किरण : हे हीलियम या मूलद्रव्याचे अणुगर्भ होत, (२) बीटा (β) किरण : हे इलेक्ट्रॉनच होत आणि (३) गॅमा (γ) किरण : म्हणजे विद्युत् चुंबकीय प्रारणाचे पुंज (विभाजन करता येत नाही अशी किमान राशी, क्वांटम) होत. १९१९ मध्ये कमी अणुक्रमांकाच्या अणुगर्भावर α कणांनी आघात केल्यास त्याचे विघटन होऊन रूपांतरण (एका मूलद्रव्यापासून दुसरे मूलद्रव्य तयार होणे) होते आणि त्यातून प्रोटॉन (p) बाहेर पडतात असे रदरफर्ड यांनी सिद्ध केले. या पहिल्या कृत्रिम
विघटन क्रिया होत. १९३४ मध्ये ईरेन झॉल्यो-क्यूरी आणि जे. एफ्. झॉल्यो या दांपत्याने ॲल्युमिनियमावर α कणांचा आघात करून त्यातून पॉझिट्रॉन(इलेक्ट्रॉनाइतकेच द्रव्यमान व विद्युत् भार असलेले पण विद्युत् भार धन असलेले मूलकण) बाहेर पडतात असा शोध लावला. विघटित केंद्रांचे रूपांतर किरणोत्सर्गी फॉस्फरसामध्ये होते व या फॉस्फरसाच्या अणुगर्भातून पॉझिट्रॉन उत्सर्जित होतात असे दिसून आले. या घटनेला त्यांनी प्रवर्तित किरणोत्सर्ग असे नाव दिले.
Answer:
किरणोत्सारी म्हणजे काय