Science, asked by Binoyvembayam32871, 11 months ago

किरणोत्सारिता म्हणजे काय?

Answers

Answered by suhanisuryawanshi29
0

Radiation

Please mark as brain list

Answered by gadakhsanket
1

★ उत्तर - युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अनुअंक असणाऱ्या मुलद्रव्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला किरणोत्सारिता म्हणतात.

रुदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली तेव्हा त्यांना प्रारणांचे ती प्रकारे विभाजन झाल्याचे आढळले.

एक प्रारण ऋण प्रभारीत पट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले.तर दुसरे प्रारण धन प्रभारीत पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे आढळले.परंतु तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात अजिबात विचलन झाले नाही.

ऋण प्रभारीत पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरणे, धनप्रभारीत किरणांना बिटा किरणे आणि अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरणे म्हणतात.

धन्यवाद...

Similar questions