(२) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
(अ) जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)
(आ) ही मुलगी खूप उत्साही आहे (उद्गारार्थी करा.)
(इ) सर्वांनी जेवायला बसावे. (आज्ञार्थी करा.)
(ई) या दुकानात सर्व वस्तू महागात आहेत. (नकारार्थी करा.)
Answers
Answer:
अ) जगात सर्वात सुखी असा कोणीही नाही.
आ) किती उत्साही आहे ही मुलगी!
इ) सर्वांनी जेवायला बसा.
ई) या दुकानात सर्व वस्तू महागात नाही आहेत.
Answer:
अ. जगात सर्व सुखी असा कोणीही नाही.
आ. किती उत्साही आहे ही मुलगी!
इ. सर्वांनी जेवायला बसा.
ई. या दुकानात सर्व वस्तू स्वस्त नाहीत.
Explanation:
विधानार्थी वाक्य-
जेव्हा बोलणारा एक साधेसे विधान करतो, त्या विधानाला विधानार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. महेश अभ्यास करतो.
उद्गारार्थी वाक्य:
ज्यावेळेस बोलणाऱ्याच्या भावना अचानक एखाद्या शब्दातून किंवा वाक्यातून बाहेर येतात, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
उदारणार्थ-
१.बापरे!एवढा मोठा साप!
२. किती वेडा आहे तू!
आज्ञार्थी वाक्य-
जेव्हा बोलणाऱ्या ने एखाद्या व्यक्तीला वाक्यातून आज्ञा दिलेली असते त्याला, आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
उदारणार्थ
१.सर्वांनी उद्या गृहपाठ पूर्ण करून आणा.
नकारार्थी वाक्य-
वाक्यात जेव्हा नकारार्थी गोष्टींचा उल्लेख केलेला असतो किंवा नकारार्थी शब्दांचा वापर केलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ- प्रवीणला बाहेर फिरायला आवडत नाही.