India Languages, asked by uttamk6038, 1 year ago

कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.
(१) मुलांनी आईवडि लांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा)
(२) आईने माझ्याकडे निराशेने पाहिले. (नकारार्थी करा)
(३) बापरे! रस्त्या वर केवढी ही गर्दी ! (वि धानार्थी करा)
(४) नेहमी खरे बोलावे. (प्रश्नार्थी करा)

Answers

Answered by manasi225
20
1) आईवडिलांची आज्ञा पाळा.
2)आईने माझ्याकडे कोणत्याही आशेने पहिले नाही.
3) रस्त्यावर खुप गर्दी आहे.
4)नेहमी कसे बोलावे?


Hope it helps u!!!
Answered by gadakhsanket
10

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "प्रीतम" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका माधुरी शानभाग आहे.

या पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे .आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या प्रीतमला

लेखिकेच्या वात्सल्याने आणि आपलेपणाने उभारले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे वर्णन या पाठात केले आहे.

◆ कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.

(१) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. आज्ञार्थी वाक्य- मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा.

(२) आईने माझ्याकडे निराशेने पाहिले.

नकारार्थी वाक्य- आईने माझ्याकडे आशेने पाहिले नाही.

(३) बापरे! रस्त्या वर केवढी ही गर्दी !

विधानार्थी वाक्य- रस्त्यावर खूपच गर्दी आहे.

(४) नेहमी खरे बोलावे.

प्रश्नार्थी वाक्य- नेहमी खरेच बोलावे का?

धन्यवाद...

Similar questions