कृष्णाची छोटी गोष्टी in written
Answers
Answer:
please tell me your question
Answer:
द्वारकेच्या श्रीकृष्णानें बाळपणीं गौळणींशीं केलेल्या बाळलीला आणि राधेशीं केलेल्या रासक्रीडा म्हणजे सामान्य मनाचा मोठा आवडीचा विषय आहे. भगवान् श्रीकृष्णानें अर्जुनाला सांगितलेली गीता आणि त्या निमित्तानें जगापुढें ठेवलेलें तत्त्वज्ञान सामान्य मराठी मनाला नीट आकलन होत नाहीं. परंतु महाभारतांतील विविध कथा ऐकून, कृष्णाबद्दलचीं जुनीं गाणीं ऐकून आणि राधाकृष्णावर आधारलेल्या कपोलकल्पित हकीकत ऐकून, त्यास कृष्णाचा महिमा मोठा वाटते आहे. ह्या कृष्णानेंच उभ्या दुनियेचा उद्धार केला हीच सर्वांची भावना.
यशोदेचा कृष्ण म्हणजे देवाचें बाळरूप. त्याचें कौतुक गावयाचें म्हणजे मनाला शांति मिळावयाची. अगदीं बालवयांत कंसाला कृष्णानें मारलें. गौळणींना सळो कीं पळूं करून सोडलें, यशोदेनें खांबाला बांधला असतां विश्वदर्शन घडविलें इत्यादि चमत्कार भाविक मनाला भुरळ पाडून सोडतात ! आणि त्यामुळें चिमुकल्या कृष्णाची ओढ ह्या मनाला एवढी लागते कीं, त्यापुढें जीवनांतील इतर सुख फिकें पडावें !
भगवान् श्रीकृष्णाच्या बाळलीलांवर आधारलेल्या कथा ऐकून स्त्रियांच्या मनाला एवढी भुरळ पडलेली असते कीं, आपलें मूलच कृष्णाच्या जागी बसवून त्या बाळलीलांचें कौतुक गातांना त्यांना अवर्णनीय आनंद होतो. त्यामुळें कृष्णाचीं गाणीं बहुतेकींच्या तोंडीं असलेलीं सर्वत्र दिसून येतात आणि विशेष म्हणजे कृष्णाष्टमीच्या वेळीचं त्यांचें गायन होतें असें नसून फावल्यावेळींहि तीं ओठांवर घोळत असतात. अशावेळीं हीं गाणीं गाणार्या बाईच्या मनांत एकच भावना तीव्रतेनें वावरत असतें कीं, आपल्या आयुष्याचें बरेंवाईट पाहणारा हा एकच देव आहे ! आणि त्यानें आपलें आयुष्य माणसासारखें घालविलेलें आहे !! त्यामुळें हीं भावना आविष्कृत होते वेळीं तिला एकप्रकारचा विलक्षण जिव्हाळा प्राप्त होतो. ती मोठ्या भक्तिभावानें फुलून वर आलेली असते. कौतुकानें तिचें सर्वांग भारावलेलें असतें.
सूर्व्या आगाशीं येतो गंगनी बाई उठूनि जेवूं मागीतो चक्रपाणी
त्याची बोलती अशी जिगुनी ( आई )
आदीं पाण्यावनं येऊं दे काना मग मी वाडीन तुला साजना
आदीं पाण्याला नको जाऊं आई मज भुकेची मोठी घाई
किष्ण जेवाया झाली घाई अजून येळ झाली न्हाई
हातीं धरूनी गोकुळचा हरी दूर देई (मारणें ) गालावरी
रागं बोलली चक्रपाणी गेला भाईरी हरी रुसूनि
अग सयानू कमळावरी हरी माझा अवकाळ भारी
नंद धुंडिल्या चारी वाटा गेला गवळ्याच्या पेठा
नंद धुंडिले यमुना तीरीं गवळ्याच्या आला घरीं
दरीं उभी राधा सुंदरी कडीवरि घेउन आली भाईरी
आली अंगनीं यश्वदा नारी संबाळा आईजी आपुला हरी
खेळतो बाळ माज्या घरीं
माता करीती लिंबलोन भुक्याल म्हनती माजं तानं
दळव्या याळूची घे खवा बर्फी सुंदर देतें बेदाना खरकी
पेढे साबण्या रेवड्या देतें बत्तासू केळं नारिंगं देतें काना घे जांभूळ
रामफळ पेरू देतें घे सिताफळ मग मी देतें पुंड्या ऊंस, जेव तूं बाळ
खिरी वेळिल्या भोपरकाळी दूधसाकरीं मग मी देतें पुरणपोळी वरती सांजूरी
देतें मी राजा दहीभात जेव तूं निचिंत
माता कडविलं साजूक लोणी वाटीभरूनी
दारीं किष्णाची बाळगोपाळ आली इड घेऊनी
हें गाणें 'कृष्णाची न्याहारी' या नांवानें लोकप्रिय आहे. सकाळच्या प्रहरीं उठल्याबरोबर कृष्णानें न्याहारीचा तगादा केला. परंतु 'अजून वेळ झाली नाहीं, उगाच घाई नको करूं' म्हणून यशोदा रागावते व मारते. त्यामुळें कृष्ण रुसून निघून जातो. यशोदा चिंतागत होते. नंद गांवभर शोधायला जातो. शेवटीं राधेच्या घरीं कृष्ण सांपडतांच यशोदेला आनंद होतो. आणि मग ती नानाप्रकार त्याला खाऊं घालते. भुकेल्या बाळाची भूक शांत करते. अशी भावना इथें आलेली आहे. शेवटीं कृष्णाचें खाणें संपतें न संपतें तोंच त्याचें मित्रमंडळ खेळायला जाण्यासाठीं गोळा झाल्याची माहिती आली आहे. त्यामुळें सामान्य स्त्रीला या सगळ्या भावनेचें ' आई ' च्या भूमिकेमधून विशेष कौतुक वाटतें.
हेंच गाणें कुठें कुठें पुढील प्रमाणेंहि ऐकावयास सापडतें-
सूर्व्या उगवुनी आला गंगनीं किष्ण उठला बोले लहाटकरी