Art, asked by pp7933736, 10 days ago

कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखारीमधे कुणाची स्फूर्ति दिसते​

Answers

Answered by XxDREAMKINGxX
31

Answer:

सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली आहे. छत्रपती राजारामांसोबत जिंजीला असताना राजारामांच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकाळातील बखर असल्याने तिला महत्त्व आहे. कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा समकालीन होता. त्याने शिवछत्रपतींच्या जीवनातील काही घटना प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्यामुळे 'सभासद बखर' ही इतर कोणत्याही बखरीपेक्षा विश्वसनीय मानली जाते. सभासदाने या बखरीत शिवजन्म, शिवाजी महाराजांची बंगलोर भेट, जुन्नर शहर लूट, राजगड बांधणी, चंद्रराव मोरे प्रकरण, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, मिर्झाराजे यांची भेट, शिवछत्रपतींची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका, सिद्दी जोहरचा वेढा, तानाजी सिंहगड घेतो, शहाजी महाराजांचा मृत्यू, राज्याभिषेक, दक्षिण विजय, शिवाजी-संभाजी मतभेद, शिवछत्रपतींचा मृत्यू यासारखे प्रसंग मोजक्या आणि नेमक्या शब्दांत लिहिलेले आहेत

Answered by rajneeshmahaseth5188
3

Answer:

Hope it is helpful to you

Attachments:
Similar questions