१) कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरुप सांगा.
३) संगीत नाटकाचे स्वरुप व वेशिष्ट्ये स्पष्ट करा,
Answers
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप : कृष्णराव हे जन्या पिढीतील बाल गोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ गायक नट आहेत. त्यांच्या या कलासेवेबद्दल कृतज्ञता म्हणून सरकारतर्फे त्यांचा सत्कार आहे. त्यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पूर्वीच्या काळी लळीत, गोंधळ, पोवाडे, कीर्तन, दशावतार, खेळे, तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते. संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात, ही धारणा होती. यातच पुढे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर' नाटका नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांची 'संगीत शाकुंतल' व 'संगीत सौभद्र' ही नाटके संगीतामुळे गाजली. त्यानंतरचे कृ. प्र. खाडिलकर यांचे 'मानापमान' हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे - यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वांच्या गायिकीमुळे खूप लोकप्रिय ठरले. रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यांतून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आशयाचे व कथानकाला गती देणारी पदे, शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो. लोकसंगीत व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ, संगीतातील वादये व समर्थ गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात.