(१) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
Answers
Answer:
क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते :
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
४) क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल?
उत्तर : क्षेत्रभेटीदरम्यान आम्ही प्रत्यक्ष निरीक्षणातून, मुलाखत व प्रश्नावली तंत्राचा वापर करून आणि क्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती मिळवू.
(५) विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबीवरून लक्षात येतो?
उत्तर : विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक विविध क्षेत्रांतील वनस्पती, घराची रचना, लोकांचे पोशाख, लोकांच्या आहारातील पदार्थ इत्यादी बाबींवरून लक्षात येतो.
Answer:
क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.