क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करताना कोणत्या साधनांचा उपयोग केला जातो
Answers
Explanation:
शाळा महाविद्यालयांमध्ये ,वकृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.तसेच शासकीय ,सामाजिक ,आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात .या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तपशील माहिती होतो.
स्वरूप :एखाद्या कार्यालयात ,संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची ,समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे ‘अहवाल लेखन ’ होय. हि नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू ,तारीख ,वेळ,सहभागी व्यक्ती ,प्रतिसाद ,समारोप अश्या विविध मुद्यांचा समावेश असतो. कार्यक्रम ,समारंभ सुरु झाल्यापासून ते थेट तो समारंभ किवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंदी अहवालात केली जाते .
अहवालाची प्रमुख चार अंगे :
प्रास्ताविक(अहवालाचा प्रारंभ )
अहवालाचा मध्य( विस्तार )
अहवालाचा शेवट ( समारोप )
अहवालाची भाषा
अहवाल लेखनाची वैशिष्टे :
वास्तुनिष्टत्ता आणि सुस्पष्टता :
अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण ,सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना ,हेतू ,निष्कर्ष इत्यादी अनेक महत्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात .
विश्वसनियता :
अहवालातील विश्वासनीय माहिती आणि तथ्यानच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसानीतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जाते .
सोपेपणा :
शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते.हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा हि सोपी होते.
शब्दमर्यादा :
अहवालाच्या विषयावर / स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रिडाविषयक ,इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात .
नि:पक्षपातीपणा :
अहवालाचा विषय कोणताही असो ,प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट म्हणजे त्या अहवालाचा नि:पक्षपातीपणा.
Answer:
अहवाल लेखन-
क्षेत्रभेटीचा अहवाल हा क्षेत्रभेटीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे कागदपत्र असते. क्षेत्रभेटीचा अहवाल नुसारच योग्य ते निर्णय घेतले जातात. क्षेत्रभेटीचा अहवाल हा त्या क्षेत्रभेटी मधून निघालेले निष्पन्न असते म्हणून क्षेत्रभेटीचा अहवाल अतिशय व्यवस्थित देणे गरजेचे असते.
क्षेत्रभेटीचा अहवाल लिहीत असताना काही महत्त्वाच्या साधनांचा उपयोग केला जातो ते खालील प्रमाणे-
- क्षेत्र भेटीमध्ये आढळलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांचा उपयोग अहवाल लिहिण्यासाठी केला जातो.
- क्षेत्रभेटी वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या मुलाखतीचा लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा समावेश अहवालात केला जातो.
- उपलब्ध असलेले पेन,पेन्सिल, पट्टी, नकाशे, नक्षी, तक्ते, रकाने, इत्यादी साधनांचा वापर अहवाल लेखणात केला जातो.