Geography, asked by nerkarseema661, 5 hours ago

क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करणार

Answers

Answered by rajraaz85
3

Answer:

क्षेत्रभेट-

एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्षात जाऊन भेट देणे व तेथील सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक घटकांची माहिती मिळवणे याला क्षेत्रभेट असे म्हणतात.

क्षेत्रभेटीला जाण्यासाठी पूर्वतयारी केली पाहिजे जसे ठिकाण निश्चित करणे, क्षेत्रभेटीच्या ठिकाणी जाण्यासाठी जाण्याचा कालावधी व वाहतुकीची कोणती साधने उपलब्ध आहे या गोष्टी लक्षात घेणे, कुठे जायचे आहे.

उदाहरणार्थ -

कारखाना, थंड हवेचे ठिकाण, समुद्रकिनारा, पर्वत, पठार, किल्ला हे निश्चित करणे, क्षेत्रभेटीचा हेतू काय आहे हे निश्चित करणे, जसे एखाद्या कारखान्याला भेट द्यायची असेल तर त्या कारखान्याच्या मालकाची परवानगी घेणे, क्षेत्रभेटीला जाताना त्या ठिकाणाची प्रश्नावली तयार करणे अशा प्रकारची पूर्वतयारी ही क्षेत्रभेटीसाठी असली पाहिजे.

Answered by krishna210398
3

Answer:क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करणार

Explanation:क्षेत्रभेटीची पूर्वतयारी

१. ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथील सर्व माहिती मिळवणे.

तेथील मार्ग, रस्ते याबद्दल सखोल जाणून घ्यावे.

२. त्या ठकाणाचा नकाक्षा सोबत घेणे.

३. प्रथमोपचार पेटी सोबत घेणे.

४. दुर्बिण, कॅमेरा, वही, पेन सोबत घेणे.

५. पाण्याची बाटली, जेवणाचा डबा घेऊन जाणे.

६. तेथील वातावरणाप्रमाणे पोशाख परिधान करावे.

७. तेथील स्थानिक भाषेबद्दल, लोकांबद्दल थोडक्यात माहिती असावी.

#SPJ3

Similar questions